Hot Posts

6/recent/ticker-posts

धार्मिक ते राजकीय क्षेत्रात महेश इंगळेंचा ठसा

 धार्मिक ते राजकीय क्षेत्रात महेश इंगळेंचा ठसा




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तसेच नगरपरिषद प्रभाग क्रमांक ११ मधून सलग पाच वेळा निवडून आलेले नगरसेवक महेश इंगळे हे विनयशील व सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव काम केले आहे, असे प्रतिपादन मनीषा कृषी उद्योगचे चेअरमन व चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी केले.

नुकत्याच पार पडलेल्या अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार महेश इंगळे यांनी विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ** देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांपासून ते राज्यभरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांपर्यंत महेश इंगळे यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची तत्परता, प्रामाणिक प्रयत्न व लोकाभिमुख दृष्टिकोन त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.यावेळी प्रथमेश इंगळे, महेश पाटील, दीपक पाटील, सुरेश सुरवसे, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सुनील पवार आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments