Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.सचिन कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

 आ.सचिन कल्याणशेट्टी यांची  निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपने नियोजनबद्ध तयारीला सुरुवात केल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होते.

आ. सचिन कल्याणशेट्टी यांना संघटन बांधणीचा मोठा अनुभव असून, यापूर्वीही त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यात प्रभावी भूमिका बजावली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आढावा घेणे, इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणे, प्रचार कार्यकर्त्यांचे संघटन, निवडणूक यंत्रणेची आखणी तसेच रणनीती तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीसाठी पक्ष अधिक जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments