वैद्यकीय पुराव्याने उघडकीस आला ॲट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 15, 2025

वैद्यकीय पुराव्याने उघडकीस आला ॲट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा

 वैद्यकीय पुराव्याने उघडकीस आला ॲट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वैद्यकीय पुराव्याने ॲट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा उघडकीस आला आणि येवती ता. मोहोळ येथील बाळासाहेब पाटोळे व त्यांच्या कुंटूंबियांची ॲट्रासिटी प्रकरणातुन निर्दोष मुक्तता झाली. येवती ता. मोहोळ येथे दि. ५/८/२०२० रोजी घरासमोरील अंगणातील फुल तोडण्याचे कारणावरुन झालेल्या वादातून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करुन खुरप्याने मारहाण केल्याच्या आरोपावरुन बाळासाहेब रामचंद्र पाटोळे (५५) त्यांची पत्नी सौ. संगीता (५०) व उच्च शिक्षित मुलगा महेश यांच्याविरुध्द उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूरातील विशेष न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते. सदर ॲट्रासिटी खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश जयदीप मोहिते यांचे न्यायालयात झाली.

घटनेदिवशी फिर्यादी आपल्या घरासमोरील अंगणातील झाडांची फुले तोडत असताना आरोपी महेश याचेबरोबर तिची भांडणे झाली. त्या भांडणात आरोपी महेश याने खुरप्याने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
फिर्यादीला ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले त्यावेळी तपासणी दरम्यान तिने वैद्यकीय अधिकाऱ्याला तिला दगडाने मारहाण झाली असे सांगितले होते. तपासणीनंतर मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये तिला खुरप्याने मारहाण झाली असा आरोप तिने केला होता.

वैद्यकीय पुराव्यावरुन तिला झालेली जखम कापीव हत्याराने झालेली नाही असे स्पष्टपणे दिसुन येते. वैद्यकीय पुरावा व प्रत्यक्ष पुरावा हा एकमेकाच्या विरोधात आहे त्यामुळे वैद्यकीय पुराव्याशी विसंगत असलेल्या साक्षीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. वैद्यकीय पुरावा फिर्यादीच्या साक्षीस विसंगतीपुर्वक असल्याने न्यायाधिशांनी पाटोळे कुटूंबियांची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे सदर सुनावणी दरम्यान फिर्यादीच्या मुलाने न्यायालयात दिलेल्या साक्षीत आपल्या समक्ष कोणतीही घटना घडली नाही अशी साक्ष देऊन आईने आरोपीविरुध्द केलेल्या आरोपाला दुजोरा देण्यास नकार दिला.

या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने ,ॲड. प्रणित जाधव, ॲड. श्रीहरी कुरापाटी, ॲड. रियाज शेख (मोहोळ), ॲड. किरण गवळी यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages