न्यासाचे कार्य हे धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारे- फडणवीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 15, 2025

न्यासाचे कार्य हे धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारे- फडणवीस

 न्यासाचे कार्य हे धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारे- फडणवीस




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य हे धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारे असून, अन्नछत्र आम्हा फडणवीस कुटुंबीयांचे श्रद्धेय असल्याचे मनोगत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे बंधू व नागपूर येथील उद्योजक आशिष फडणवीस यांनी व्यक्त केले.

ते सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, एस.के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने,श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, रमेश हेगडे, , धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, शुभम सावंत, विनायक भोसले, समर्थ शिंदे, किरण साठे, महांतेश स्वामी, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages