आ. राजू खरेंचा मोहोळ मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांवर आवाज
नागपूर (कटूसत्य वृत्त):- हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृहात बोलताना महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण नियम मी अध्यक्ष महाराजांच्या निदर्शनास आणला—
शासकीय घरकुलासाठी शासनाकडून तीन ब्रास वाळू मोफत देण्यात येते, परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एकाही घरकुल धारकाला ही वाळू आजतागायत मिळालेली नाही.
या अनियमिततेवर तातडीने कार्यवाही करून संबंधित लाभार्थ्यांना तीन ब्रास वाळू मिळावी, अशी ठाम मागणी सभागृहात केली.
त्यानंतर मतदारसंघातील अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले—
पानंद रस्त्यांचा अभाव.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटली, तरीही मोहोळ मतदारसंघातील अनेक गावांना पानंद रस्ते उपलब्ध नाहीत. शेतापासून गावापर्यंत येण्यासाठी शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढावा लागतो. दळण-वळण, शेती विकास आणि दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे असलेले पानंद रस्ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मंत्री महोदयांसमोर मांडली.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सभागृहात ठेवलेल्या प्रस्तावाला मी पूर्ण पाठिंबा दर्शविला, कारण हा प्रस्ताव जनसामान्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे.
मोहोळ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी माझा हा प्रयत्न असाच ठामपणे सुरू राहील.

0 Comments