Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना उबाठा ही स्थानिक अस्मिता असून मशाल हे विकासाचे प्रतीक असल्यामुळे उज्वला अमर कांबळेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

 शिवसेना उबाठा ही स्थानिक अस्मिता असून मशाल हे विकासाचे प्रतीक असल्यामुळे उज्वला अमर कांबळेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा



ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांचे आवाहन

उज्वला कांबळे यांच्यासह शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील अनेक भागात मशाल पदयात्रेचे उस्फुर्त आयोजन

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

शिवसेना उबाठा पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार उज्वला अमर कांबळे यांनी संपूर्ण शहरातील प्रचारावर लक्ष केंद्रित करत प्रत्येक प्रभागांमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या अधिकृत उमेदवारा समवेत जनसंवाद यात्रा प्रचार फेरी पदयात्रा कॉर्नर बैठका यावर मोठा भर दिला आहे. शिवसेनेने निष्ठावंत शिवसैनिक अमरअण्णा कांबळे यांच्या सुविद्य पत्नी उज्वला कांबळे यांना उमेदवारी देत संपूर्ण शहरातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विजयी होण्याची संधी दिली आहे. अमरअण्णा कांबळे हे जुन्या प्रभाग क्रमांक १२ आणि १३  मध्ये मोठा जनसंपर्क असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देत आजवरच्या पक्षनिष्ठेचा सन्मान दीपक मेंबर गायकवाड यांनी जपला आहे त्यामुळे कांबळे परिवारातील संपूर्ण शहरातील स्नेही आणि मित्र परिवारातील सदस्य उज्वला कांबळे यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.

प्रभाग 12 आणि 13 या जुन्या दोन प्रभागांचा मिळून नव्याने निर्माण झालेल्या प्रभागात मध्ये शिवसेनेने दोन दिग्गज उमेदवारांना उमेदवारी देत नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी देखील याच प्रभागाला दिल्यामुळे या प्रभागातील शिवसैनिकांचा उत्साह दुणावला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी या प्रभागात मशाल यात्रा संकल्पनेतून भव्य शिवसैनिक आणि मतदार बंधू भगिनी समवेत पदयात्रा काढत सर्व शहराचे लक्ष वेधून घेतले. दीपक गायकवाड यांच्या भगिनी महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई पाटील, सोमनाथ पवार, डॉ. संग्राम गायकवाड, हर्षल देशमुख नगरसेवक पदाचे उमेदवार नागेश थिटे, ओबीसी प्रवर्गातील महिला उमेदवार शबाना शेख यांनीही आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह या मशालयात्रेमध्ये सहभागी होत संपूर्ण प्रभागासह शहरातील जनतेला शिवसेना मशाल चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन एकमुखाने केले.

चौकट
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला अमर कांबळे यांनी संपूर्ण शहरातील प्रभागांमध्ये महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांसह त्याचबरोबर शिवसैनिकांसह डोअर टू डोअर प्रचारावर भर देण्याबरोबर पक्षाचा वचननामा सर्वांना पोहोच केला आहे. निवडणूक चिन्हाच्या बॅलेट पेपरचा नमुना मतदारांसमोर सादर करत शिवसेनेच्या मशाल चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले आहे. उज्वला कांबळे यांच्या प्रचारात शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व उमेदवारांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत शिवसेना एकवटल्याचे सर्व शहराला दाखवून दिले आहे. जुनी शिवसेना ही शहराची अस्मिता असून मशाल हे विकासाचे चिन्ह आहे त्यामुळे उज्वला कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने मोहोळच्या नगराध्यक्षपदी विराजमान करावे असे आवाहन जेष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी विविध प्रचार यात्रा दरम्यान केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments