Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा पक्ष नगरपरिषदेवर भगवा फडकवणार

 ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा पक्ष नगरपरिषदेवर भगवा फडकवणार



शिवसेनेचे युवा नेते डॉ. संग्राम गायकवाड यांचा विश्वास

मोहोळची स्थानिक अस्मिता आणि विकासाची जाण फक्त शिवसेना उबाठा पक्षालाच

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराची अस्मिता जपणाऱ्या आणि मोहोळ मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण चार दशकापासून असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांची सर्वाधिक पसंती मिळणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक दीपक (मेंबर ) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या निवडणुकीत मोहोळ नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास शिवसेनेचे युवा नेते डॉ.संग्राम गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

यापूर्वी दीड दशकापूर्वी देखील तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आणि स्थानिक कारभाऱ्यांच्या स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळलेल्या मोहोळवासियांनी मोहोळ ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवत पक्षाच्या महिला आघाडीच्या कणखर आणि खंबीर नेत्या सीमाताई पाटील यांना सरपंचपदी महत्त्वपूर्ण संधी दिली होती. त्यानंतर गत नगर परिषद निवडणुकीतही प्रभाग क्रमांक १५ मधून सीमाताई पाटील या मोठ्या मताधिक्याने विजयी होत मोहोळ मधील जनता ही विकास करणाऱ्यांच्या पाठीशी असते हे दाखवून दिले. तोच विश्वास आणि मोहोळ शहराची स्थानिक अस्मिता पुन्हा एकदा जागृत होऊन मोहोळ शहरातील सुजाण आणि सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या मशालीला प्रज्वलित करून विरोधकांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देणार आहे असेही डॉ.संग्राम गायकवाड यावेळी म्हणाले.

चौकट
ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड हे अत्यंत संयमी आणि मुत्सद्दी कार्य शैलीचे अनुभवी नेते म्हणून संपूर्ण मोहोळ तालुक्याला परिचित आहेत त्यांच्या पुढाकारातूनच विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या विरोधात एकीकरणाच्या लढ्याला प्रारंभ झाला. शेवटपर्यंत त्यांनी ठाम आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र राहून कडवी झुंज दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनच्या विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीला ताबा मिळवता आला. नगरपरिषद निवडणुकीतही जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीपक मेंबर गायकवाड यांच्या सार्थ नेतृत्वाखाली आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिन्ह मशालीद्वारे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याबरोबर नगराध्यक्ष पदही खेचून घेईल असा आम्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.

डॉ संग्राम गायकवाड
 युवा नेते शिवसेना उबाठा
Reactions

Post a Comment

0 Comments