Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग ९ मधून खुल्या प्रवर्गातून सरताज सर्फराज सय्यद यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 प्रभाग ९ मधून खुल्या प्रवर्गातून सरताज सर्फराज सय्यद यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


शिवसेना शिंदे पक्षाकडून धनुष्यबाण चिन्हावर लढवणार नगरपरिषद निवडणूक

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्वसाधारण प्रवर्गातून सरताज सर्फराज सय्यद यांनी काल आपला उमेदवारी अर्ज पक्षाच्या शिवसैनिकांसमवेत उपस्थित राहून दाखल केला आहे. सरताज शेख या मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांचे निकटवर्तीय समर्थक असलेले आणि सामाजिक क्षेत्रात विशेष नावलौकिक कमावलेले सर्फराज सय्यद यांच्या सुविद्य पत्नी आहेत. पक्षाने त्यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करत प्रभाग क्रमांक नऊ मधून मैदानात उतरवल्यामुळे या प्रभागातील स्थानिक दिग्गज उमेदवारांना आता त्यांना आव्हान देण्यासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे जरी तोंडपाठ झाली असली तरी प्रभागातील समस्या देखील सर्वसामान्यांना तोंडपाठ आहेत यापूर्वीच्या प्रभाग क्रमांक १४ मधील अंतर्गत गटारीचे प्रश्न त्याचबरोबर उखडलेले रस्ते वाढलेल्या बाभळी घाणीचे साम्राज्य यामुळे मोहोळ शहरातील सर्वाधिक अधोगतीला गेलेला प्रभाग म्हणून या जुन्या प्रभाग १४ आणि नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक नऊ कडे पाहिले जाते. या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून सर्फराज सय्यद यांनी जनसंपर्क ठेवत समस्यांचा पाठपुरावा करत शासन दरबारी प्रयत्नशील राहून त्या सोडवल्या आहेत. या कामी त्यांना आमदार राजू खरे यांचाही मोठा मार्गदर्शनात्मक हातभार लागला आहे. त्यामुळे सरताज यांची उमेदवारी निश्चितपणे या प्रभागात शिवसेना शिंदे पक्षाच्या दृष्टीने जमेची बाब ठरत आहे.

चौकट
दर निवडणुकीला चार दिवस अगोदर येऊन मतदारांची दिशाभूल करून नंतर आपापल्या व्यवसायात गुरफटणाऱ्या पार्टटाइम राजकारण करणाऱ्यांना आता प्रभाग पुरता वैतागला आहे. त्यामुळे स्थानिक आणि प्रभागाला पूर्ण वेळ देणाऱ्या लोकप्रतिनिधीची अपेक्षा सरताज सय्यद यांची उमेदवारी पूर्ण करू शकते. त्यामुळेच सर्फराज सय्यद आणि सरताज सय्यद यांनी या प्रभागातील जनसंपर्क सातत्याने वाढवला आहे. प्रभागातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या धडपडी आणि प्रामाणिक हेतूच्या सरताज सय्यद या उमेदवाराला निश्चितपणे येत्या काळात आणखी पाठिंबा वाढणारा असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो.
Reactions

Post a Comment

0 Comments