Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग १० मधून सारिका सागर लेंगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने लेंगरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र

 प्रभाग १० मधून सारिका सागर लेंगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने लेंगरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र



पक्षाच्या आव्हानात्मक काळात घेतलेल्या मेहनतीची कदर आणि पक्षश्रेष्ठींबद्दल त्यांच्या मनात असलेल्या आदराची पोचपावती नक्की मिळणार

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या दीड दशकापासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेले यापुर्वी सोशल मीडिया सेलच्या जिल्ह्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले युवा उद्योजक सागर लेंगरे यांच्या सुविदय पत्नी सारिका सागर लेंगरे यांनी काल दिनांक १६ रोजी प्रभाग क्रमांक दहा मधून ओबीसी महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आरक्षण सोडती पासूनच सागर लेंगरे निवडणुकीच्या रिंगणात आपल्या परिवारातील सदस्याला उतरवणार अशी खात्री त्यांच्या समर्थकांना आणि प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांना होती. ओबीसी महिला आरक्षण सोडत झाल्यामुळे स्वतः सागर लेंगरे यांच्या ऐवजी त्यांच्या सुविद्य पत्नीने निवडणूक लढवावी अशी विनंती लेंगरे यांना प्रभागातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळेच या निवडणुकीत लेंगरे परिवाराने भक्कमपणे पाऊल ठेवले.

सागर लेंगरे यांनी या प्रभागाचे यापूर्वीचे नगरसेवक सुशीलभैय्या क्षीरसागर यांच्या यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनाखाली प्रभाग १६ आणि १७ मध्ये यापूर्वी पासून विविध प्रभागातील समस्या सोडवण्याच्या निमित्ताने जनसंपर्क अविरतपणे सुरू ठेवला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी त्यांच्या परिवारातील सदस्याला मिळावी अशी मागणी सागर लेंगरे यांनी पक्ष प्रक्रियेच्या अधीन राहून पक्षाकडे केली. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुका अध्यक्ष सतीश काळे, निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर यांना प्रत्यक्ष भेटून केली होती.

चौकट
आज भारतीय जनता पक्षाच्या अंतिम उमेदवारी वाटपाची यादीमध्ये निश्चितपणे सागर लेंगरे यांच्या सुविद्य पत्नी सारिका यांचा समावेश होणार असल्याची खात्री त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच पक्षश्रेष्ठी निश्चितपणे सागर यांच्या आजवरच्या पक्षनिष्ठेची कदर आणि त्यांनी पक्षासाठी अतिशय आव्हानात्मक काळात दिलेले योगदानाची दखल घेऊन त्यांच्या परिवारातील सदस्याला उमेदवारीची संधी नक्की देतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments