नातेपुते येथे २१ नोव्हेंबर पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज ६७५ वा संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने नातेपुते येथील श्री विठ्ठल मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवार दि.२१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेला आहे.ह. भ. प. गुरुवर्य मनोहर महाराज भगत यांच्या प्रेरणेतून विशेष या सप्ताहास अनेक वर्षांची अखंड परंपरा आहे.या निमित्त विठ्ठल मंदिर परिसरत भव्य दिव्य आकर्षक मंडप रोषणाई करण्यात आली असून या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकडाआरती, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायं.५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन होणार आहे. तसेच या सप्ताहातील कीर्तन महोत्सव शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समस्त उपस्थित ग्रामस्थांच्या यांच्या हस्ते कलश पूजन करून सप्ताहास प्रारंभ होणार आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली.दि.२१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते १० या वेळेत ह भ प उमेश महाराज दशरथे आळंदी, दि.२२ नोव्हेंबर रोजी ह भ प एकनाथ महाराज चत्तर शास्त्री आळंदी, दि. २३ नोव्हेंबर रोजी ह भ प पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू,दि. २४ नोव्हेंबर रोजी ह भ प महादेव महाराज जाधव मुंबई,दि.२५ नोव्हेंबर रोजी ह भ प महाराज कासारखेडकर जळगाव,
दि. २६ नोव्हेंबर रोजी ह भ प गणेश महाराज भगत नातेपुते, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत काल्याची किर्तनसेवा. संतवीर ह भ प बंडातात्या कराडकर, संस्थापक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होईल.तरी या सर्व कार्यक्रमाचा समस्त ग्रामस्थांसह भाविकांनी लाभ घ्यावा व तन-मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले.सप्ताह समिती अध्यक्ष गणेशजी पागे,दत्तात्रेय उराडे,बापूसाहेब भांड,प्रविण काळे,अमोल पाडसे, गणेश कुचेकर,मंगेश दीक्षित,श्रीकांत कुचेकर, ज्ञानेश्वर घनवट, केतन पिसे,मनोज राऊत,अमित चांगण, भागवत कर्चे, आदेश थोरात, सागर पोटे, शेखर पिसे, अभिजित म्हामणे, दत्ता कर्चे, सुनिल घुले,दिलिप लाळगे, अमर भिसे, विजय कवितके, सागर जठार, सागर ढवळे, पुष्पक काळे, सोनु लांडगे, सागर भोसले,निलेश बरडकर, विनायकराव उराडे हे सप्ताह नियोजनासाठी परिश्रम घेत आहे.

0 Comments