महामानव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यशपाल लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा भव्य उपक्रम
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महामानव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यशपाल लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी व परिसरात समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. वाढदिवसाच्या औचित्याने मूकबधिर निवासी शाळा, टेंभुर्णी येथे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच केळी, संत्री, मोतीचूर लाडू, बिस्किटे व चॉकलेट्सचे वाटप करून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उजनी नगर (टेंभुर्णी) येथे विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य आणि आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे वाटप करत शिक्षणाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. गोविंद वृद्धाश्रम येथेही गरजू घटकांना फळांचे वाटप करण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. टेंभुर्णी ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना स्वेटर वाटप करून त्यांच्या निष्ठावान सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. थंडीतही गावाच्या स्वच्छतेसाठी अविरत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव नागरिकांनीही कौतुकाने केला.
हे सर्व उपक्रम शेखरभाऊ जगताप युवा मंच महाराष्ट्र राज्य, विजय कोकाटे मित्रपरिवार, महामानव प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. तसेच श्री नागनाथ मतिमंद विद्यालय आनंद नगर केम येथे सर्व विद्यार्थ्यांना भोजनदान गरुडा ग्रुप तर्फे देण्यात आले व सेवा आणि समाजकार्याचे हे मूल्य जपण्यात युवा पिढीही पुढे येत असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
या सर्व उपक्रमांचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष सुरजभैय्या देशमुख (शरद पवार गट), रावसाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखरभाऊ जगताप, विकास धोत्रे, विजय कोकाटे, आशिष लोंढे,गणेश देशमुख, संतोष देशमुख, विशाल म्हस्के, संतोष इंगळे सर, रंजीत गायकवाड, सचिन पांडव, समीर नाईकनवरे, महेश धोत्रे, प्रतीक माने, राजू जगताप, नितीन चव्हाण, सनी जगताप, रोहन लोंढे, संतोष साळवे, सौरभ शिंदे, अविनाश धोत्रे, करण सरोदे, स्वप्नील लोंढे, सिद्धांत लोंढे, आयुष खरात तसेच शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेचे संचालक लालासाहेब पाटील उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी यशपाल लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत पुढील काळातही समाजासाठी निःस्वार्थीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

0 Comments