Hot Posts

6/recent/ticker-posts

*लोकमंगल कृषी महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी*

 *लोकमंगल कृषी महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी*


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते. सदरील कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी योगिता शिंदे हिने बाल दिनाची संकल्पना समजून सांगितली. विद्यार्थी मनोगता मध्ये संजना पाटील, संस्कार ठेले, सानिका सावंत आणि साक्षी काळे यांनी आपले विचार पुष्प व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार आणि सद्यस्थितीतील आवश्यकता या विषयावरील संस्कार ठेले याच्या भाषणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. यानंतर कार्यक्रमांमध्ये रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अजित कुरे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी बालवयातील चिकित्सक वृत्ती, प्रयत्नवादी दृष्टिकोन, सातत्य, प्रांजळ आणि संस्कारक्षम मन इत्यादी बाबींची तरुणाईला महाविद्यालय शिक्षण घेत असताना  नितांत गरज असल्याचे विशेष नमूद केले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारधारेवर आणि योगदाना वर देखील त्यांनी विविध उदाहरणाद्वारे प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा शेवट हा रासेयो स्वयंसेविका प्रणिती चोरमले हिच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गौरव शिंदे याने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सुजाता चौगुले, प्रा. नम्रता गोरे आणि प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. 
Reactions

Post a Comment

0 Comments