टेंभुर्णीत हॉटेल 7777 मध्ये कामगारावर अमानुष अत्याचार; नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
टेंभुर्णी येथील हॉटेल 7777 मध्ये कामगारावर अमानुष अत्याचार आणि मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलच्या मालक लखन हरिदास माने यांच्याविरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.घटनाक्रमानुसार, २०२५च्या ऑगस्ट महिन्यातील एका रात्री रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास हॉटेल 7777 येथील आरोपी मालकाने आपल्या कामावर तक्रार म्हणून फिर्यादी आप्पासाहेब नकातेंचा, ज्यांचे वय ४४ आहे, अक्षरशः अमानुष अत्याचार केला. आरोपीने फिर्यादीचे अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले व त्याच्याकडे असलेली २ हजार रुपये जबरदस्तीने घेतली. त्यानंतर तो फिर्यादी नाग्न अवस्थेत हॉटेलच्या बाहेर असलेल्या इतर कामगारांसमोर उभा केला आणि शिवीगाळ करत अपमानित केले. या अनैतिक आणि अत्याचारी वर्तनाने इतर कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली.या घटनेत आरोपीने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पाठीवर जोरदार मारहाण केली. शिवाय, “तू तक्रार दिलीस किंवा काम सोडलेस तर तुला जिवे ठार मारीन” अशा धमक्या दिल्याचा देखील तक्रारीत उल्लेख आहे. या घटनेदरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणाच्या उघडकीस येताच १५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३१ वाजता टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने या घटनेची दखल घेत 7777 चा मालक लखन माने यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले व यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार टेंभुर्णी बीटचे ASI तांबोळी यांनी गुन्हा दाखल केला आहे तर तपास सपोनी चौधरी यांच्या देखरेखीत सुरू आहे. पोलिसांनी वापरलेले हत्यार म्हणून लोखंडी पाईप जप्त केला आहे.या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये संताप आणि कामगारांवरील शोषणाविरुद्ध तीव्र भावना निर्माण झाली असून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कामगारांचे हक्क आणि सुरक्षितता यासाठी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा हॉटेल मालकावरती कडक कारवाई करण्याची सर्वसामान्य नागरिकातून मागणी होत आहे

0 Comments