उपक्रमशील लाळगे शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धेत प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 17, 2025

उपक्रमशील लाळगे शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धेत प्रथम

 उपक्रमशील लाळगे शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धेत प्रथम



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ मोहोळ येथील उपक्रमशील व मेहनती शिक्षक दत्तात्रय लक्ष्मण लाळगे यांनी महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आता त्यांची पुणे विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत मोहोळ तालुक्यातून इयत्ता 1 ली ते 7 वीतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बहुउद्देशीय शैक्षणिक साहित्य या त्यांच्या अभिनव निर्मितीला सर्वोच्च मानांकन मिळाले. लाळगे यांनी तयार केलेले साहित्य अभ्यासक्रमाशी सुसंगत, आकर्षक व विद्यार्थ्यांना सहज शिकता येईल असे असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लाळगे यांच्या यशाचे कौतुक करत मोहोळचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख राजकुमार राऊत, तसेच अंका साबळे, राजेंद्र बारबोले आणि सुरेश पवार यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

लाळगे यांच्या निवडीमुळे मोहोळ तालुक्यात अभिमानाचं वातावरण असून, पुणे विभागीय स्पर्धेतही ते यश मिळवतील, अशी आशा शिक्षणवर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages