पद्मजादेवी मोहिते पाटील अजित पवार राष्ट्रवादीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 17, 2025

पद्मजादेवी मोहिते पाटील अजित पवार राष्ट्रवादीत

 पद्मजादेवी मोहिते पाटील अजित पवार राष्ट्रवादीत


पद्मजादेवी यांच्याकडे अकलूज नगरपरिषद निवडणुकीचे नेतृत्व 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यासह,उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात( अजित पवार गट )अकलूज येथे उमेश पाटील यांच्या उपस्थिती मध्ये नुकताच प्रवेश केला.
           पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगरपरिषदेची निवणुक लढवली जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट)जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी जिल्हा निरीक्षक सुरेश पालवे,तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख,युवक जिल्हा अध्यक्ष अक्षय भांड,अतुल सरतापे,माणिक मिसाळ,सुधीर रास्ते, अण्णा शिंदे व मोठ्या संख्येने जनसेवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
      अकलूज येथे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना जनसंपर्क कार्यालयात पद्मजादेवी मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश झाला. यानिमित्ताने उमेश पाटील बोलत होते. 
       पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले की प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ स्मरणात राहील असा होता.ते तडफदार नेतृत्व होते.मोहिते पाटील कुटुंब हे बारामती पवार कुटुंबाशी जोडलेले कुटुंब आहे.काळाच्या ओघात काही गोष्टी घडत गेल्या आता नव्याने त्यामध्ये दुरुस्ती होताना दिसत आहे.सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश अजित दादांच्या उपस्थित पार पडणार असल्याचे सांगत त्यांनी अकलूज नगरपरिषदेचे नेतृत्व पद्मजादेवी मोहिते पाटील करणार आहेत असा निर्णय अजितदादांनी घेतला असल्याचे म्हणाले.तसेच 26 उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याचे सांगितले तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून ऍड. दिव्यानी रास्ते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.


*चौकट* 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही कामानिमित्त भेट घेतली होती.त्यांचा स्पष्टवक्तेपणा व कार्यकर्त्यांना ताकत देण्याची भूमिका वाखण्याजोगी असल्यानेच कार्यकर्त्यांना ताकत देण्यासाठी आपण पक्ष प्रवेश केला आहे. *पद्मजादेवी मोहिते पाटील*

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages