संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी शिवश्री खुळे यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर (माढा विभाग) जिल्हाध्यक्षपदाची धुरा शिवश्री सचिन खुळे यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
ही निवड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज दादा आखरे, महासचिव सौरभ दादा खेडेकर, निरीक्षक डॉ. सुदर्शन तारख, संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा ॲड. राहुल वाईकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य किरणराज घाडगे आणि रा.का.सदस्य दिनेश जगदाळे यांच्या संयुक्त शिफारसीनुसार जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी निवडीचे पत्र देऊन नव्या जिल्हाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अभिमन्यू पवार, राज्य संघटक शिवश्री मनोजकुमार गायकवाड, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड शिवश्री सचिन बापू जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री बालाजी जगताप, शहराध्यक्ष, टेंभुर्णी शिवश्री योगेश मुळे, माजी तालुका कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड माळशिरस शिवश्री शरदजी लिगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन जबाबदारी स्वीकारताना सचिन खुळे यांनी संचलन समितीचे आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानून, “संघटनेची वैचारिक परंपरा आणि समाजहिताचे कार्य गावोगावी पोहोचवण्यासाठी निष्ठेने काम करणार” असा विश्वास व्यक्त केला.
सोलापूर (माढा विभागात) या नियुक्तीमुळे संभाजी ब्रिगेडची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

0 Comments