“शुभप्रसंगी पुस्तक भेट द्या”- अशोक खानापुरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “शामची आई” या महान साहित्यकृतीच्या एक लाख प्रतींचे वितरण पूर्ण झाल्याची माहिती देत, “प्रत्येकाने पुस्तक वाचन केलेच पाहिजे. शुभप्रसंगी पुस्तक भेट देणे हीच सर्वोत्तम संस्कृती आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर पुस्तकांची विक्री व्हावी,” असे उद्गार साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष अशोक खानापुरे यांनी काढले.
हुतात्मा सार्वजनिक वाचनालय आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती, बालदिन आणि ग्रंथालय सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात सोलापूर वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष अशोक म्हमाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत वाचन संस्कृतीच्या वृद्धीवर भर दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. वृषाली हजारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेविका गीतांजली गंभीरे यांनी मानले. वाचनालयाचे कार्यवाह व ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी पंडित नेहरूंच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या बालप्रेमाची आठवण करून दिली.
कार्यक्रमाला लक्ष्मीकांत साळी, शशिकांत माने, विनोद चंदेले, नितीन चौधरी, अब्दुल रहमान शेख, प्रतीक नकाते, रोहितकुमार राम, संतोष कोरे, ऋषिकेश दांडगे, मल्लिनाथ गोणे, गड्डम यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.
वाचन संस्कृतीला प्रेरक ठरणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
.jpg)
0 Comments