Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ ज्ञान मंदिर, कोंडी येथे बालदिन उत्साहात साजरा

 जिजाऊ ज्ञान मंदिर, कोंडी येथे बालदिन उत्साहात साजरा

कोंडी (कटूसत्य वृत्त):- जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलात बालदिन—पंडित जवाहरलाल नेहरू जयंती—उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष शिवश्री गणेश निळ यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब निळ यांनी केले. बालदिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये सुंदर भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी बालदिनाचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडत उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष गणेश निळ म्हणाले,
“पंडित नेहरूंना देशाचे भवितव्य लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये दिसत होते. त्यांच्या मनात मुलांबद्दल अपार प्रेम होते. या तरुणाईमध्ये देशात मोठा बदल घडवण्याची खरी क्षमता आहे,” असे त्यांनी सांगितले.
नर्सरी आणि प्ले ग्रुपमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर रिमिक्स गीतांवर सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले. नयनरम्य सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अर्चना औरादे, मुख्याध्यापक वैभव मसलकर, विकास जाधव, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बोराडे मॅडम यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments