Hot Posts

6/recent/ticker-posts

बालदिनानिमित्त स्वामी विवेकानंद प्रशालेत चित्रकला स्पर्धा

 बालदिनानिमित्त स्वामी विवेकानंद प्रशालेत चित्रकला स्पर्धा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी स्वामी विवेकानंद शिशु व प्राथमिक शाळा तसेच स्वामी विवेकानंद प्रशाला येथे सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल इंडिया (RTI-309) तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली.
इयत्ता ३री ते ५वी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा,
इयत्ता ६वी ते ८वी विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक विषयांवरील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.

स्पर्धेसाठी आवश्यक चित्रकला साहित्य राऊंड टेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. पूजन राऊंड टेबल ट्रस्टचे पदाधिकारी, स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर, तसेच स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी राऊंड टेबलचे राष्ट्रीय कन्वेनर तरंग शहा आणि स्पर्धेचे समन्वयक नितेश संकलेचा यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमास राऊंड टेबलचे उपाध्यक्ष अभिजीत मालाणी, खजिनदार पंकज सचदेव, सेक्रेटरी अभिषेक जवर, सदस्या नयना सचदेव तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन क्रीडाशिक्षक सुभाष माने यांनी केले. बालदिनाच्या निमित्ताने आयोजित ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणारी व सर्जनशीलतेला वाव देणारी ठरली.
Reactions

Post a Comment

0 Comments