अजित गांधी दिशाभूल करत आहेत- ॲड.नितीन खराडे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- नसलेल्या जमिनीचा बाव करत अजित गांधी दिशाभूल करत असल्याचे ऍड नितीन खराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अजित गांधी यांनी माझी जमीन हडप केली आहे असा दावा करत आहेत, त्या अनुषंगाने शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव ऍड नितीन खराडे यांनी, पत्रकार परिषदेचे आयोजन करून सत्य परस्थिती समोर मांडण्याचा प्रयत्न केला.यावेळी ऍड नितीन खराडे म्हणाले की, सन 1992 ते 2006 पर्यंत मी शिक्षण प्रसारक मंडळात सचिव म्हणून काम केले आहे.
सध्या अजित गांधीचा व्हिडिओ समाज माध्यमात फिरत आहे,जी जमीन अस्तित्वात नाही ती हडप केली असल्याचे अजित गांधी सांगत असल्याचे ऍड नितीन खराडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना ऍड नितीन खराडे म्हणाले की सरकारने गट क्रमांक 346 मधील 16 एकर 29 गुंठे जमीन संस्थेला एक्वार केली होती, पैकी 1 एकर 11 गुंठे उर्वरित रस्त्यात गेली ती आम्हाला मिळाली नाही.त्यावेळी अजित गांधी यांनी पूर्व बाजूस अतिक्रमण केले होते. त्यावेळी संस्थेच्या बाजूने निकाल लागला होता.अजित गांधीच्या नावावर पोकळ सातबारा उतारा आहे म्हणजेच, नसलेल्या जमीनीचा बाव करून अजित गांधी दिशाभूल करत आहे.त्याने शेतकरी बँकेचीही फसवणूक केली आहे. नसलेली जमीन त्यांनी बँकेला विकली असल्याचेही ऍड नितीन खराडे यांनी सांगितले.

0 Comments