Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर पालिकेच्या सर्व जागा सक्षमपणे लढण्यासाठी सर्वार्थाने ताकद उभी करणार

 सोलापूर पालिकेच्या सर्व जागा सक्षमपणे लढण्यासाठी सर्वार्थाने ताकद उभी करणार

     

         पिंपरी चिंचवड (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्हय़ाचे नूतन सहसंपर्कमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या पिपरी चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा सादर केला.
            त्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नूतन सहसंपर्कमंत्री ना.अण्णा बनसोडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर सर्वांच्या वतीने सोलापूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले.प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,ज्येष्ठ नेते तोफिक शेख,प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे,प्रदेश ओबीसी सरचिटणीस डाॅ.बसवराज बगले, नगरसेवक सिद्धेश्वर आनंदकर, नगरसेवक गणेश पुजारी,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  
            सर्वांचे मनोगत ऐकून घेऊन सोलापूर शहराचा आढावा घेत सहसंपर्क मंत्री बनसोडे यांनी येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी जास्तीत जास्त वेळ देणार असून सोलापुरातील 26 प्रभागांमध्ये 102 उमेदवार सक्षमपणे लढण्यासाठी सर्वांनी जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे साहेब आणि स्वतः मी प्रत्येक असे आम्ही सर्वजण प्रत्येक उमेदवाराला सर्वार्थाने ताकद देण्याचे काम करणार आहोत,आपण निर्धास्तपणे ही निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय मिळवावा असेही ते म्हणाले.
            या बैठकीत प्रमुख पदाधिकारी सर्वश्री जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश सचिव इरफान शेख,नजीब शेख, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे,विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे,शहर उपाध्यक्ष उमेश जाधव आदि उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments