सिद्धनाथ जगताप याची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 19, 2025

सिद्धनाथ जगताप याची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

 सिद्धनाथ जगताप याची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी ( कला ) मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सिद्धनाथ जगताप याने १२ ते १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद क्रीडा विभाग रत्नागिरी यांच्या  वतीने श्री विठ्ठलराव जोशी चारिटी ट्रस्ट डेरवण क्रीडा संकुल डेरवण तालुका, चिपळूण. जिल्हा, रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत क्रॉस कंट्री मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून सिद्धनाथ जगताप याची पुढील होणाऱ्या राष्ट्रीय  मैदानी क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबद्दल  संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी  मोहिते पाटील, संचालक मार्गदर्शक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील,  संचालिका उर्वशीराजे  मोहिते पाटील,प्रभारी प्राचार्य डॉ.बी.टी. निकम, पर्यवेक्षक बी. टी. वाघमोडे  यांनी जगताप या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या खेळाडूला प्राध्यापक पैलवान नारायण माने यांचे मार्गदर्शन लाभले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages