Hot Posts

6/recent/ticker-posts

राजवर्धन गुंड याचे एमबीबीएस परीक्षेत उज्ज्वल यश

 राजवर्धन गुंड याचे एमबीबीएस परीक्षेत उज्ज्वल यश


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचा सुपुत्र व सध्या कुंभारी-सोलापूर येथील अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी राजवर्धन राजेंद्रकुमार गुंड याने एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या वार्षिक निकालात 72.11 टक्के गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादित केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

राजवर्धन गुंड याने प्रथम वर्षाच्या परीक्षेत 900 पैकी 649 गुण प्राप्त केले आहेत. त्यास अश्विनी मेडिकल कॉलेजमधील शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.त्याचे 10 वी पर्यंतचे शिक्षण माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे.तो विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांचा नातू व आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांचा मुलगा आहे. त्याचीआई मेघना गुंड या गृहिणी आहेत.

त्याचे अभिनंदन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे,माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत,संचालक गणेश काशीद, गटशिक्षणाधिकारी विकास यादव,डॉ.विनोद शहा,चेअरमन अनिलकुमार अनभुले,अशोक चव्हाण,हनुमंत उबाळे,अरुण मोरे,प्राचार्य डॉ.महेंद्र कदम, डॉ.मोहन शेगर,प्रा.डॉ.नेताजी कोकाटे,प्रा.डॉ.संतोष कदम, डॉ.सोहम तळेकर,अमित चव्हाण,नेताजी उबाळे,सौदागर गव्हाणे,सुशेन भांगे,सुधीर गुंड, सुहास शिंगाडे,सतीश गुंड, सज्जन मुळे,भिवाजी जाधव, सौदागर खरात,कैलास सस्ते यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments