तरुण, उच्चशिक्षित चेहरा देण्यास समर्थक आग्रही; सोशल मीडियावर 'वादळा'ची जोरदार चर्चा
शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. ११ मधून इंजि. वैभव कोते 'वादळा'साठी सज्ज
शिर्डी (तुषार महाजन):- शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे २०२५ वारे वाहू लागले असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच प्रभागांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असताना, प्रभाग क्रमांक ११ हा यंदाच्या निवडणुकीत वैभव कोते चर्चेत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, या प्रभागातून एक तरुण आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून इंजि. वैभव सुधाकर कोते पाटील यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून जोरदार चर्चेत आले आहे.
इंजि. वैभव कोते यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असून, गेल्या काही काळापासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. एक 'अभियांत्रिकी' पदवीधर असलेला सुशिक्षित तरुण राजकारणात सक्रिय होत असल्याने, त्यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रभागातील अनेक तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि समर्थकांनीच इंजि. कोते यांना यावेळची निवडणूक लढवण्याचा जोरदार आग्रह केल्याचे समजते.
याच ध्येयाअंतर्गत, वैभव कोते यांनी पुढील काही वर्षांत शिर्डीमध्ये राबविण्याचे महत्त्वाचे प्रकल्पही नियोजित केले आहेत. यामध्ये प्रत्येक रस्त्यावर उत्तम दिवाबत्ती व्यवस्था करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची सोय उपलब्ध करून देणे, 'हरित शिर्डी' मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण आणि उद्याननिर्मिती करणे, तसेच महिलांसाठी सुरक्षात्मक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सध्या इंजि. वैभव कोते यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे 'वादळ' सुरू केले आहे. "वादळवाऱ्याने आम्ही नव्हे, तुफानाने दिवे आम्ही तुफानाने दिवे!!" अशा जोशपूर्ण घोषणा आणि आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या या डिजिटल प्रचारामुळे प्रभागातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्र. ११ मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अंतर्गत रस्ते, स्वच्छता आणि तरुणांच्या रोजगारासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी एका अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेवकाची गरज असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. इंजि. वैभव कोते यांच्या रूपाने एक 'नियोजनबद्ध' विकास करू शकणारा उमेदवार मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.
याचबरोबर, राज्याचे लोकप्रिय नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तरुण तडफदार माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा भक्कम आशीर्वाद व सक्रिय पाठिंबा वैभव कोते यांना लाभला आहे. या राजकीय पाठबळामुळे कोते यांची विकासयात्रा अधिक वेगाने पुढे जात आहे. जनतेचा विश्वास आणि अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन यांच्या जोरावर शिर्डीमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी वैभव सुधाकर कोते पाटील सज्ज झाले आहेत.
एकंदरीत, इंजि. वैभव कोते यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे प्रभाग क्र. ११ मधील लढत अत्यंत चुरशीची आणि रंजक होणार यात शंका नाही. ते आपली अधिकृत घोषणा केव्हा करतात, याकडेच आता संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागून आहे.

0 Comments