Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती

 जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मैदर्गी,दुधनी,मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, बार्शी या नगरपरिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्ह्याचे प्रभारी,माजी आमदार, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे मुलाखती घेण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार सर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके,प्रदेश सचिव सुरेश हावळे, शाहिनताई शेख,रविकिरण कोळेकर, निरीक्षक जावेद काझी,राजेंद्र शेरखाने,पांडुरंग कुंभार,अँड. अर्जुंनराव पाटील,राजकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे,अशपाक बळोरगी, मोतीराम चव्हाण, सिद्राम पवार, अरुण जाधव,अशोक देवकते उपस्थित होते.

इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती दरम्यान प्रभारी मोहन जोशी म्हणाले की आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या नियोजनावर संघटनात्मक रणनीतीवर तसेच स्थानिक विकासवर सविस्तर चर्चा करून संघटना मजबूत करून निवडणुकीत उतरावे असे आवाहन केले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार म्हणाले की मतदार काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत. पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधावा. विरोधी पक्षाला लोक आता कंटाळले असून महागाई, बेरोजगारी, महिला वरील अत्याचार या सर्व गोष्टी गोष्टींना लोक वैतागले आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस चांगले दिवस येतील खासदार प्रणितीताई शिंदे, देशाचे नेते मा. सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवहान श्री शटगार यांनी केले.
यावेळी मोहोळ नगरपरिषद ३५, अक्कलकोट नगरपरिषद २५, मैदर्गी नगरपरिषद १०, दुधनी नगरपरिषद २६,मंगळवेढा नगरपरिषद २३,सांगोला नगरपरिषद २६,अकलूज नगर परिषद २६, पंढरपूर नगरपरिषद ४०,करमाळा नगर परिषद २२, कुर्डूवाडी नगरपरिषद २५, बार्शी नगरपरिषद ३९, इच्छुकांनी  यावेळी यांनी मुलाखती दिल्या.
सकाळी १० वाजल्यापासून मुलाखतीस सुरुवात झाली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या.

काँग्रेस पक्षाने आघाडी झाली तर ठीक अन्यथा काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. असे जिल्हाध्यक्ष सातलींग शटगार यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, किशोर पवार ,मल्लिकार्जुन पाटील, प्रशांत साळे, राहुल घुले, गिरीश शेटे, प्रतापराव जगताप, भीमाशंकर जमादार , अजयसिंह इंगोले, संजय पाटील ,आदित्य फत्तेपूरकर, विजय साळुंखे, सतिश पाचकुडवे, तोहिद मुल्ला, फिरोज खान, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार, अर्जुनराव पाटील, राजकुमार पवार, मोतीराम चव्हाण, सिद्राम पवार, अमोल म्हमाने, गजेंद्र खरात, रमेश हसापुरे, दत्तात्रय सावंत, अमजद शेख, संतोष शिंदे, सुनीता आवगडे, नाथा ऐवळे, बाळासाहेब मगर, अशोक देवकते, हणमंत मोरे, धर्मराज पुजारी, सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, वसिम पठाण, सिकंदरताज पाटील,जाहिर मनेर,बाळासाहेब दळवी, जहांगीर शेख, राहुल पाटील, सुहास भाळवणकर, समीर कोळी, अमर सूर्यवंशी,संदिप शिंदे, बाळासाहेब आसबे ,भाग्यवंत नायकुडे, सोमनाथ आरे, दत्तात्रय गाडवे, शिवाजी धोत्रे,अँड रणजित पाटील,हमिद शिकलगार, निवेदिता आरगडे, तानाजी जगदाळे, निखिल मस्के, राकेश नवगिरे आदी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments