Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची 'कॅप जेमिनी' या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

 मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची 'कॅप जेमिनी' या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड


 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सोलापूर येथील जिल्हास्तरीय मुलीचे शासकीय वसतिगृह (इतर मागास बहुजन कल्याण) येथे प्रवेशित असणान्या मुलीनी इंजिनिअरींग क्षेत्रात दैदिप्यमान यश प्राप्त केले.

            सोलापूर शहरात जिल्हास्तरीय इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर या कार्यालयाकडून चालविण्यात येणाऱ्या मुलीचे शासकीय वसतिगृह (इमाबक, सोलापूर) येथील B.Tech. या वर्गात शिकणाऱ्या मुली 1. श्रुती राहुल पवार 2. अस्मिता हणमंत हळदे या दोन मुलीनी उत्तुंग भरारी घेत यशाला गवसणी घातलेल्या आहेत.

            कु. पवार व कु. हळदे या दोन्ही मूली श्री. सिध्देश्वर महिला इंजिनिअरींग महाविदयालयात B.Tech. चौथ्या वर्षात शिकत असताना 'कॅप जेमिनी' या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांची निवड झालेली आहे.

            या कर्तृत्ववान मुलींची सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या त्यांच्या यशाबद्दल सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, विभाग गणेश सोनटक्के, श्रीकांत आव्हाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब आणि शासकीय मुलीचे वसतिगृह विभागाचे कार्यासन सांभाळणारे वरिष्ठ लिपिक मोनिका हिरेमठ मॅडम व बनसोडे, कार्यालयातील इतर कर्मचारी व वसतिगृहाचे अधिक्षक श्रीम. पुनम गायकवाड व वसतिगृहातील सर्वच कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. कु. श्रुती पवार व कु. अस्मिता हळदे या विदयार्थीनीचे 'कॅप जेमिनी' या कंपनीमध्ये निवड झाल्यानंतर  दोन्ही मुलीचे सत्कार करण्यात आले.

            शासकीय मुलीचे (इमाबक) वसतिगृहात मिळणाऱ्या सोयी सुविधा व शैक्षणिक व व्यवसायिक मार्गदर्शन याबाबत कु. श्रुती पवार व कु. अस्मिता हळदे यांनी  सहायक संचालक, इमावक सोलापूर गणेश सोनटक्के यांचे आभार व्यक्त केले.  इतर मागास बहुजन प्रवर्गातील मुलींनी शासनाने चालविलेल्या मुलीच्या शासकीय वसतिगृहांचा लाभ घेवून स्वतःचा व समाजाचा विकास करावा, असे आव्हान कु. श्रुती पवार व कु. अस्मिता हळदे यांनी केले.


Reactions

Post a Comment

0 Comments