वृद्ध लोककलावंत मानधन योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचली पाहिजे- बाळासाहेब सरगर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- वृद्ध लोककलावंत मानधन योजनेमध्ये पाच हजार रुपये मासिक मानधन मिळत असुन सध्या दहा प्रस्ताव मंजूर केले आहेत. नवीन तीस प्रस्ताव दाखल केली आहेत.या योजनेमध्ये पाच हजार रुपये मासिक मानधन मिळते.कलावंतांना या योजनेचा म्हातारपणी मोठा आधार असणार असल्याने नवनियुक्त सदस्यांनी ही योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवून प्रभावीपणे राबवली पाहिजे असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केले.ते जाधववाडी ता. माळशिरस भगवंत मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या कलावंताच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. ते पुढे बोलत असताना म्हणाले की, ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नवनियुक्त सदस्य ब्रह्मदेव केंगार, सागर महाराज बोराटे यांची पालकमंत्री जयकुमार गोरे,माजी आ. राम सातपुते यांनी नियुक्ती केली आहे. मेळाव्यासाठी वृद्ध कलाकार यामध्ये तमाशा कलावंत, भजनी कलावंत, वाजंत्री, पोतराज, देऊळ वाले, डोंबारी असे अनेक क्षेत्रातील कलावंत उपस्थित होते. उपस्थित कलावंतांना योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र व इतर गोष्टींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात काकासाहेब जाधव ,सागर महाराज बोराटे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. मेळाव्यासाठी संजय देशमुख मंडळाध्यक्ष नातेपुते, सागर महाराज बोराटे, काकासाहेब जाधव ओबीसी मंडळ अध्यक्ष अकलूज, देविदास पाटील नातेपुते मंडळ उपाध्यक्ष भाजपा उपस्थित होते. प्रास्ताविक सागर महाराज बोराटे यांनी केले असून कार्यक्रमाचे आभार ब्रह्मदेव केंगार महाराज यांनी मानले.
.jpg)
0 Comments