Hot Posts

6/recent/ticker-posts

तुतारी चिन्हावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार : आ. जानकर

 तुतारी चिन्हावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार : आ. जानकर



 

पिलीव (कटूसत्य वृत्त):-  संभाव्य नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 'तुतारी' या चिन्हावरच लढविणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची रणनीती आखली जात असल्याचे आ. उत्तमराव जानकर यांनी सांगीतले.


माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील एका खासगी कार्यक्रमाला आल्यानंतर नागरी आघाडीच्या वतीने आयोजित माजी सरपंच अमोल मदनेपाटील यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आ. जानकर बोलत होते. यावेळी मळोली गावचे पंचायत समिती माजी सदस्य रणजितसिंह जाधव, चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ, नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफखान पठाण, राजेंद्रसिंग जामदार, कल्याण जावळे, उमेश सरवदे, महावीर धायगुडे, दुर्वा सोलंकर, खानबाबा पठाण आदी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments