Hot Posts

6/recent/ticker-posts

जगतापांची एकला चलो' ची भूमिका

 जगतापांची एकला चलो' ची भूमिका



नगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राजकीय पटलावर अनेक गणित मांडली जात

असून गेल्या १९९६ पासून ,करमाळा नगरपालिकेवर सत्तेत  असलेल्या जगताप गटाला सुरुंग लावण्यासाठी विरोधी गट एकत्र आल्याचे चिन्ह दिसत आहेत. याला शह देण्यासाठी जगताप यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कोणाशीही आघाडी न करता नगराध्यक्ष पदासाठी २१ उमेदवार दिले आहेत.

करमाळा नगरपालिकेमध्ये २१ जागेसाठी निवडणूक होत आहे नगराध्यक्षपदी सर्वसाधारण

महिलेसाठी राखीव आहे. या जागेवर सर्वच गटांनी आपापल्या पद्धतीने हक्क सांगितला आहे. त्यामुळे

यामधून होणाऱ्या आघाड्या विस्कटल्या आहेत. परिणामी आता चौरंगी लढतीवरून तिरंगी लढती

होताना दिसत आहे. माजी आमदार जयंतराव जगताप, माजी आमदार शामलताई बागल, नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी याबरोबरच सावंत गटांचे प्राबल्य नगरपालिकेत मोठे आहे. आमदार नारायण पाटील यांनी नगरपालिकेची निवडणूक कधीही लढवलेली नाही. तरीही त्यांचा मतदार हा निर्णायक आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठ्या आघाड्या करण्यासाठी ज्या त्या पक्षाचे समर्थक व नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत मात्र जगताप गटाशी सावंत गटाबरोबर युती होणार असल्याची ही आता अफवा ठरली आहे. दोघांनीही नगराध्यक्ष पदासाठी दावा केल्याने ही युती होऊ शकली नाही.

बागल गटाशी सावंत गटाबरोबरची युती ही केवळ राजकीय दोन टोकाच्या विरोधामुळे होत

नसल्याचे बोलले जात आहे. बागल गट सध्या भाजपमय झाल्याने व त्यांचे कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे धोरण असल्याने त्याला छेद सावंत गटाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ही युती होणे शक्य नाही. सध्या तरी बागल, जगताप, सावंत हे गट स्वतःचे अस्तित्व टिकवून आहेत. एकेकाळी करमाळा नगरपालिकेत अधिराज्य गाजवणारे नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी हे माजी

आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक असताना ते भाजपावासी झाले आहेत. त्यामुळे नागरिक संघटना, बागल गट व भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांची अधिकृत युती झाल्याचे स्पष्ट

झाले आहे.

त्यामुळे बागल देवी व भाजपचे गणेश चिवटे हे भाजपाच्या एकाच छत्राखाली असल्याने त्यांचा

एक गट तयार झाला आहे. त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट व शहर

विकास आघाडीचे सावंत गट अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह वापरणार आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments