आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्धार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 22, 2025

आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्धार

 आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्धार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पार्टी) आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या मित्रपक्षांची निवडणूक पूर्वतयारीसाठी समन्वय बैठक हॉटेल सिटी पार्क, सोलापूर येथे पार पडली.

बैठकीस माजी आमदार आडम मास्तर, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पार्टी), चे अध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर यु. एन. बेरिया, शंकर पाटील, भारत जाधव, अशोक निंबर्गी सर,  M.H. शेख, CPM जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, नलिनीताई कलबुर्गी यांच्यासह तीनही पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार आडम मास्तर व प्रकाश यलगुलवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व माजी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे यांच्याशी मोबाईल द्वारे संवाद साधून महाविकास आघाडीच्या मजबूत ऐक्यावर चर्चा केली. सर्व मित्रपक्षांनी महापालिका निवडणूक एकजुटीने लढविण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages