भैरवनाथ जन्मोत्सव संपन्न : कीर्तन सेवा व सप्ताह समाप्तीने भक्तिमय वातावरण
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील भीमा नदीच्या तीरावर ती असलेले वाशिंबे जागृत देवस्थान ग्रामदैवत भैरवनाथ महाराज जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताह , ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व जन्मोत्सवानिमित्त भव्य सात दिवस कीर्तन सेवा पार पडली.हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भैरवनाथांच्या मूर्तीची विशेष पूजा व अभिषेकाने झाली. जन्मोत्सव कीर्तनाची सेवा ह.भ.प. दयानंद कोरेगावकर महाराज यांनी 'भैरवनाथ चरित्र' या विषयावर भावपूर्ण कीर्तन सादर केले. कीर्तनात भैरवनाथांच्या बाललीला, कृपा व चमत्कारांच्या कथा सांगितल्या गेल्या, ज्यामुळे उपस्थित भक्त भावविवश झाले. कीर्तनादरम्यान भक्तांनी टाळ-मृदंगाच्या साथीने भजन गायन केले.
सकाळी ८ आठ वाजल्यापासून विविध कार्यक्रम व दिंडी प्रदक्षिणा विधी पार पडला. काल्याची कीर्तन सेवा वाशिंबाचे सुपुत्र गायनाचार्य ह. भ .प .माऊली महाराज झोळ यांनी अनेक विषयांना स्पर्श करत उपस्थित्यांना ज्ञान अमृत पाजले.त्यांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
सप्ताह मध्ये गावातील भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतल सेवा केली. सात दिवस अन्नदात्यांकडून अन्नदानाची सेवा केली गेली.मंदिर ट्रस्टने सर्व कार्यक्रम नियोजित पार पाडले. समस्त निमकर परिवाराच्यावतीने महाप्रसाद अन्नदान सेवा पंगत पार पडली.

0 Comments