Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसेना नेते तथा माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांचा भाजपात प्रवेश

 पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसेना नेते तथा माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांचा भाजपात प्रवेश




मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ भाजप नेते राजन पाटील पॉवर मोडमध्ये..

शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार पाडत भाजपची राजकीय सरशी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास तथा पंचायत राज विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सुरू केलेले मिशन लोटस दरम्यान यापूर्वी मोहोळचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील आणि अनगरकर -पाटील परिवाराने प्रवेश केल्यानंतर मोहोळ तालुक्याची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. गोरे मोहोळमध्ये आले असता त्यांच्या उपस्थितीत मोहोळचे ज्येष्ठ शिवसेना (उबाठा)चे  नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात काल प्रवेश केला. त्यांच्या समवेत गायकवाड परिवारातील शिवसेनेचे युवा नेते असलेले युवा उद्योजक विक्रांत गायकवाड आणि शेती क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेले कृषी उद्योजक वैभवदाजी गायकवाड यांच्यासह बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्व माननाऱ्या युवा शिवसैनिकांनी देखील प्रवेश केला. 

याप्रसंगी ज्येष्ठ नेते राजन पाटील,जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ चवरे, सुरेश राऊत, तालुकाध्यक्ष सतीश काळे, रमेश माने, निवडणूक प्रभारी सुशीलभैया क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, विकास वाघमारे, अंकुश अवताडे, प्रवीणनाना डोके, प्रमोद डोके, ज्येष्ठ नेते तथा भावी जि.प. सदस्य शंकरराव वाघमारे,गुरुराज तागडे,गणेश झाडे, मुजीप मुजावर, विक्रांत गायकवाड, वैभव गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
मोहोळ शहरात बाळासाहेब गायकवाड यांच्या परिवाराचा मोठा स्नेह परिवार मोहोळ शहर आणि तालुक्यात आहे. त्यांचे बंधू ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कृषी उद्योजक विष्णुपंत गायकवाड यांची त्यांना भक्कमपणे साथ आजवर मिळाली आहे. त्यांची सुपुत्र वैभव दाजी गायकवाड आणि पुतणे विक्रांत विष्णुपंत गायकवाड हे देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यापूर्वीपासूनच कार्यरत आहेत.  शिवाय मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीणनाना डोके आणि युवा उद्योजक प्रभाकरदादा डोके त्याचबरोबर यापूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके हे त्यांचे भाच्चे आहेत. तीनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या भगिनी निलावती द्रोणाचार्य डोके यांना प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी दिली आहे. आता त्यांचे सख्खे बंधू बाळासाहेब गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये देखील मोठा सकारात्मक बदल होऊन त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.


चौकट
नगरपरिषदेचे मतदान केवळ दहा ते बारा दिवसावर येऊन ठेपलेले असताना पक्षांतर्गत नाराजी आणि निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेतल्यामुळे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेपासून काहीसे दूर राहणार असल्याबाबतची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमावर काही दिवसापूर्वी शेअर केली होती. तेव्हापासून बाळासाहेब गायकवाड हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत मोठी उत्सुकता होती. शिवसेनेच्या या जेष्ठ आणि लढवय्या नेत्याने पालकमंत्री ना. गोरे आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना उबाठा शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मोहोळ शिवसेना वर्तुळात 'भाऊ " या उपनावाने सर्व शिवसैनिक आणि शहरवासीयांना परिचित असलेल्या बाळासाहेब गायकवाड यांनी गेल्या तीन दशकापासून शिवसेनेच्या संघटन कौशल्याची धुरा सक्षमपणे सांभाळली आहे. शिवाय त्यांनी मोहोळचे सरपंचपद देखील भूषवले आहे. शांत कार्यशैलीबरोबर एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब गायकवाड परिचित आहेत त्यांच्या प्रवेशाचा निश्चितपणे मोठा फायदा येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला होणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments