Hot Posts

6/recent/ticker-posts

पुढील पन्नास वर्षाच्या विकासात्मक व्हिजनसाठी शहरवासीयनिश्चितपणे भाजपला साथ देतील- माजी आमदार यशवंत माने

 पुढील पन्नास वर्षाच्या विकासात्मक व्हिजनसाठी शहरवासीयनिश्चितपणे भाजपला साथ देतील- माजी आमदार यशवंत माने




माजी आमदार यशवंत माने यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर आणि  सुशील क्षीरसागर यांनी घेतली भेट

एकदिलाने निवडणूक जिंकण्याचा मा.आमदार यशवंत माने यांनी दिला शब्द


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-



गेल्या दहा वर्षात मोहोळ शहरात शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून त्या माध्यमातून मोठी विकास कामे पूर्ण झाली आहेत. अंतर्गत दळणवळणाच्या प्रश्नाबरोबर गेल्या अनेक दशकापासून रखडलेला मोहोळ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न देखील सोडवण्यामध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपाने मोठे यश मिळवले आहे. पालकमंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे ज्येष्ठ भाजप नेते तथा माजी आमदार आपणा सर्वांचे मार्गदर्शक राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह सर्वच्या सर्व वीस उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी विकासाला प्राधान्य देणारा या मतदारसंघाचा माजी आमदार म्हणून निश्चितपणे तुम्हा सर्वांना मोलाची साथ आणि शुभेच्छा राहतील.आपण सर्वांनी मिळून या नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाच्या झेंडा एकदिलाने फडकवूया असा विश्वास मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ येथे माजी आमदार यशवंत माने यांची भेट घेऊन निवडणुकीतील प्रचारा संदर्भात विविध विषयावर चर्चा करत त्यांच्याकडून निवडणुकीसाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत निवडणूक प्रभारी सुशीलभैय्या क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ चवरे, सतीशआबा पाटील, सागर लेंगरे इत्यादी उपस्थित होते. 

यावेळी माजी आमदार यशवंत माने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे यांचे विकासाचे  डेव्हलपमेंट मिशन निश्चितपणे गौरवास्पद बाब आहे. मोहोळ शहराच्या पुढील ५० वर्षाच्या विकास आराखड्यासाठी भाजपाच भक्कमपणे साथ देऊ शकतो याची खात्री शहरवासीयांना असल्यामुळे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांच्यासह निश्चितपणे भाजपाच्या सर्वच उमेदवारांना विजयी करून या विकासाच्या वाटचालीमध्ये सहभागी होतील असाही विश्वासही यावेळी माजी आमदार माने यांनी व्यक्त केला.



चौकट
याप्रसंगी सुशीलभैय्या क्षीरसागर हे मा.आमदार यशवंत माने यांचे आशीर्वाद घेत असताना आ. यशवंत तात्यांनी  अत्यंत जिव्हाळ्याने सुशील क्षीरसागर यांना आवर्जून घट्ट आलिंगन देत त्यांच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवत माध्यमांना फोटोसाठी दिलेली पोझ पाहून काही वेळ या ठिकाणचे वातावरण अतिशय भावनिक बनले. कारण गेल्या काही वर्षांपूर्वी या दोन परिवारामध्ये काही अंशी आलेल्या क्षणिक राजकीय कटुतेला या भावनिक प्रसंगामुळे निश्चितपणे कायमस्वरूपी पुर्णविराम मिळाल्याचे यावेळी स्पष्टपणे जाणवले.



चौकट
मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये यापूर्वीपासून माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंततात्या माने यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या निवडणुकीत भाजपाची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार या भूमिकेतून आज निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर आणि अन्य भाजप पदाधिकाऱ्यां समवेत माजी आमदार माने यांची आवर्जून भेट घेऊन त्यांच्याकडून या निवडणुकीसाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा स्वीकारल्या. त्यांनी यावेळी आवर्जून शहरातील विकासाच्या मुद्द्यांबाबत त्याचबरोबर निवडणुकीतील जनसंपर्क आणि मूलभूत सुविधांबाबत सर्वसामान्यांशी साधल्या जाणाऱ्या संवादा बाबत अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आणि सदैव क्षीरसागर परिवारासोबत राहण्याचे अभिवचन दिल्यामुळे मी त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करते.
शितल क्षीरसागर नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार
Reactions

Post a Comment

0 Comments