Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचा कॉर्नर सभांचा महाआरंभ!

 मोहोळमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचा कॉर्नर सभांचा महाआरंभ!






पॅनल प्रमुख रमेश बारसकर,आ.राजू खरे,जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा गाजनार झंझावत

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत उद्या निर्णायक टप्प्याचा अध्याय सुरू होत असून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरभर कॉर्नर सभांचा महाआरंभ होणार आहे. शहरात आधीच घरभेटी, गाठीभेटी प्रचारामुळे वातावरण तापले आहे. त्यातच आजच्या कॉर्नर सभांमुळे निवडणूक अधिकच रंगात येणार आहे.

मोहोळ शहराचे प्रमुख नेते आणि पॅनल प्रमुख रमेश बारसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मोहोळच्या विविध प्रभागांत जोरदार सभांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या सभांमधून नागरिकांसोबत थेट संवाद साधला जाईल तसेच गेल्या 30 वर्षांतील रखडलेल्या विकास कामांवर बारसकर स्वतः स्पष्ट भूमिका मांडणार आहेत.

या सभांसाठी मोहोळ तालुक्याचे आमदार राजाभाऊ (राजू) खरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असून या तिकडीच्या नेतृत्वामुळे आजच्या सभांना मोठी गर्दी उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पॅनलमधील सर्व उमेदवार आज सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण ताकदीने प्रचारात उतरतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील सभेनंतर शहरात निर्माण झालेली विकासाची सकारात्मक हवा आता कॉर्नर सभांमधून प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मोहोळच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार रमेश बारसकर,राजू खरे,उमेश पाटील या तिकडीने केला असून नागरिकांमध्ये या सभेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. शहरात आजपासूनच पथनाट्य, वाहन रॅल्या आणि डोर-टू-डोर संपर्क मोहिमा वाढल्या आहेत.

मोहोळमध्ये आज होणाऱ्या कॉर्नर सभांमुळे निवडणुकीचा कल कोणत्या दिशेला झुकतो हे देखील स्पष्ट होऊ लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नागरिकांच्या प्रतिसादावरून आजचा दिवस हा निवडणुकीतील "टर्निंग पॉईंट" ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments