Hot Posts

6/recent/ticker-posts

शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या माध्यमातून गिरीजा अरुण गोफणे यांनी दिले अनेक दिग्गजांना आव्हान

 शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या माध्यमातून गिरीजा अरुण गोफणे यांनी दिले अनेक दिग्गजांना आव्हान





गत निवडणुकीत चर्चेत आलेल्या अरुण गोफणे यांच्या जनसंपर्काचा गिरीजा गोफणे यांना होणार मोठा फायदा

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील सर्वपक्षीय दिग्गज उमेदवारांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्ह हाती घेऊन गिरीजा अरुण गोफणे यांनी सर्वांना या निवडणुकीत मोठ्या शर्थीने झुंज द्यायचे ठरवले आहे. प्रचारादरम्यान त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद निश्चितपणे या प्रभागात तुतारीचा झेंडा फडकवणार अशी खात्री होत आहे.
गिरीजा गोफने या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि गत नगरपरिषद निवडणुकीत जिद्दीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने निवडणूक लढवणारे अरुण दिगंबर गोफणे यांच्या सुविद्य पत्नी आहेत.अरुण गोफणे प्रभागात सर्पमित्र म्हणून संपूर्ण शहरात परिचित असलेल्या अरुण गोफणे यांनी अनेक जीवघेणे साप सर्वसामान्यांच्या घरातून सुखरूप बाहेर काढत जंगलात सुरक्षित सोडून  अनेकांना मदत केली आहे. बांधकाम क्षेत्रात गवंडी कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवनात कार्यरत असलेला हा एक कार्यकर्ता प्रभागात मोठी कार्यकर्त्यांची साखळी निर्माण करताना दिसून आला आहे. याच युवा कार्यकर्त्यांचा मोठा फायदा या निवडणुकीच्या प्रचारात त्यांना होताना दिसत आहे.

चौकट
गवंडी कामाच्या माध्यमातून अनेक प्रभागवासियांच्या त्यांचे जवळ निकटचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची अनेकांना जवळून पारख आहे. त्यांचा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा स्वभावच त्यांना या निवडणुकीत मोठी लोकप्रियता मिळवून देताना दिसत आहे. अरुण गोफणे यांनी कोविड कालावधीमध्ये सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू पोहोच करण्याबरोबर आवश्यक त्या ठिकाणी फवारणी आणि आरोग्यविषयक किट त्यांनी पोहोच केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेली समाजसेवा त्यावेळी प्रभागात चर्चेचा विषय बनली होती. आहेत त्यामुळे कोविड कालावधीत त्यांनी घडवलेले माणुसकीचे दुर्मिळ दर्शन आता या निवडणुकीत त्यांना सर्वसामान्यांच्या आपुलकीचा प्रतिसादाच्या रूपात परत मिळत आहे. त्यामुळे गिरीजा गोफणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे
 
चौकट
शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी आमदार रमेश कदम यांनी त्यांना उमेदवारी सुपूर्द करत या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी ताकद दिली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच गोफणे यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क यापूर्वीपासूनच आहे त्यामुळे उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांना मोठा उत्साह प्राप्त होऊन त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे या परिसरातील प्रत्येक वाडीवस्त्यावर गवंडी कामाच्या रूपाने पोहोचलेल्या अरुण गोफणे यांच्या स्वभावामुळे त्यांच्या पत्नी गिरीजा यांना मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळताना दिसत आहे त्यांच्या प्रचारामध्ये धनशक्ती पेक्षा सर्वसामान्यांची मनशक्ती स्पष्टपणे असल्याचे जाणवत आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा हा उमेदवार आता विजयाच्या दिशेने दिमाखात आगे कूच करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments