Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक आठ मधील विजयासाठी पक्षाबरोबर शिवसैनिकांचीही प्रतिष्ठा पणाला

 प्रभाग क्रमांक आठ मधील विजयासाठी पक्षाबरोबर शिवसैनिकांचीही प्रतिष्ठा पणाला




दिवंगत निष्ठावंत शिवसेना नेते रामदासनाना थिटेंचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक प्रभागावर शिवसेनेचा भगवा फडकवणार

नागेश थिटे आणि शबाना शेख यांच्या विजयाच्या माध्यमातून पश्चिम भागात शिवसेनेची मशाल आपले अस्तित्व कायम ठेवणार



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रभाग आठ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नागेश थिटे आणि शबाना शेख यांच्या विजयासाठी प्रभागात मोठ्या प्रमाणात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. याच प्रभागातून नगराध्यक्ष उज्वला कांबळे यांची देखील मोठी वोट बँक असल्यामुळे शिवसेनेने या प्रभागातील विजयावर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. या प्रभागामध्ये अनेक पक्षांचे रथी महारथी जरी निवडणुकीसाठी उभे राहिले असले तरी यंदा नागेश  थिटे यांच्या विजयाच्या रूपाने प्रभागावर शिवसेनेचा मशालरुपी भगवा फडकवण्याचा पक्का निर्धार प्रभागातील जनतेने प्रचारा दरम्यान स्पष्टपणे बोलून दाखवला आहे.

प्रभाग आठ मधील मतदार कागदोपत्री विकासाला पुरता वैतागला आहे.इतरांच्या प्रचाराच्या वेळी मतदान करतो म्हणून माना डोलवणाऱ्या शिवसेनेच्या पारंपारिक मतदारांनी आता मशालीलाच पुर्णता मतदान करायचं मनोमन ठरवले आहे. प्रभागात यापूर्वीच्या पक्षांनी आणलेल्या कोट्यावधी रुपयांचा फायदा प्रभागाला कमी आणि ठेकेदारांना जास्त झाला आहे. विकास केला आहे म्हणणाऱ्यां पक्षांना मतदारांची नाराजी दूर करण्याची वेळ का येते असाही सवाल शिवसैनिकातून उपस्थित केला जात आहे.
प्रभागातील शिवसेनेचे युवा नेते सोमनाथ पवार, शिवसेना युवा संघटक डॉ. संग्राम गायकवाड, हर्षल देशमुख, जिब्राईलभाई शेख यांनी प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेची मशाल पोहोचवल्यामुळे या प्रभागातील नागेश थिटे यांचे मशाल चिन्हाचे पारडे आता निर्णायकरित्या जड झाले आहे.

चौकट
प्रभागातील ओबीसी महिला प्रवर्गाच्या उमेदवार शबाना शेख यांचे सुपुत्र जिब्राईल यांनीही प्रभाग ना प्रभाग पिंजून काढत आपली मोठी ताकद या प्रभागातील शिवसेनेच्या विजयासाठी सक्रिय ठेवली आहे. गुलशन नगर मधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला दिशाभूलीचे राजकारण करून छेद देण्यासाठी अनेक जणांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळताना दिसत नाही. या ठिकाणी जिब्राईलभाई शेख आणि त्यांच्या स्नेह परिवारातील अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारार्थ तळ ठोकून आहेत. या प्रभागावर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्याची स्वप्न स्वर्गीय रामदासनाना थिटे यांचे आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेटे परिवारातील सदस्यही मोठ्या निष्ठेने कामाला लागले आहेत.

चौकट
टीकाटिपणी आणि भाषणबाजी कमी आणि चाणाक्ष रणीतीने काम मात्र ज्यादा अशी पक्षकामाची ओळख संपूर्ण शहरासह पूर्ण जिल्ह्यात निर्माण करू शकलेले जेष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांनी या प्रभागातून नागेश थिटे यांच्या विजयासाठी निर्णायक रणनीती आखायला यापूर्वीपासूनच प्रारंभ केला आहे. या प्रभागातील अल्पसंख्याक आणि अन्य समाजाची मोठी वोट बँक लक्षात घेता शिवसेनेने उत्तम सामाजिक सलोखा आणि भाईचारा यांचा समन्वय साधण्याचा केलेल्या प्रयत्नच नागेश थिटे आणि शबाना शेख यांच्या विजयासाठी फलदायी ठरताना दिसत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments