प्रभाग १o मधून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार चैतन्यबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ
संपूर्ण देशमुख परिवार सक्रिय
चैतन्यबापू देशमुख,प्रसाद देशमुख यांचा प्रभागातील प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात झंझावात
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये देशमुख परिवारातील उमेदवारीचा समावेश झाल्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे आता या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाची मोठी ताकद निर्माण करताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख यांनी आपले सुपुत्र तथा सीपी उद्योग समूहाचे युवा उद्योजक चैतन्यबापू देशमुख यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवत शहराच्या राजकारणामध्ये मोठ्या चर्चेला उधाण आणले. हे तेच पद्माकरअप्पा देशमुख आहेत ज्यांनी दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण करत काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेत राष्ट्रवादीला सत्तेच्या बाजूला सारत शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायतवर फडकवला होता. तेव्हापासून पद्माकरआप्पा देशमुख यांचे धक्कातंत्राच्या राजकारणाची मोहोळ शहराला प्रचिती आली. आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, ओबीसी विभागाचे शिवसेना शिंदे पक्षाचे राज्याचे नेते रमेश बारसकर, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनीही आपली पुर्ण ताकद चैतन्यबापु देशमुख यांच्या विजयासाठी लावली आहे
आता त्याच पद्माकर अप्पा देशमुख यांनी आपल्या सुपुत्राच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकल्यामुळे अनेक जण गर्भगळीत होताना दिसत आहेत. चैतन्य यांचे बंधू या निवडणुकीचे मास्टर प्लॅनर प्रसाद देशमुख हे देखील संपूर्ण प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.गतनिवडणुकीत त्यांचे पुतणे शिवसेनेचे युवा नेते विक्रम देशमुख केवळ नऊ मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी पद्माकर आप्पा देशमुख यांच्या परिवारातील जेष्ठ सदस्यांचे निधन झाल्यामुळे हा परिवार पूर्ण ताकतीने या निवडणुकीच्या प्रचारात उतरू शकला नाही. त्याचा मोठा फायदा भाजपाला होऊन भाजपाने या ठिकाणी विजय संपादित केला. होता. आता पुन्हा देशमुख परिवारात निवडणुकीच्या रिंगणात उतरून धनुष्यबाणाच्या चिन्हावर प्रभावीपणे मतदान मागताना दिसत आहे.
चौकट
आता या प्रभागातून पुन्हा शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून पद्माकरअप्पा देशमुख आणि भाजपा यांचा सामना होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पद्माकरअप्पा देशमुख यांनी यावेळी सोबत गाढवे -माने वस्ती मधील यापूर्वी भाजपमध्ये राहिलेले दाजी गाढवे यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका सुवर्णा गाढवे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या भाजपमध्ये असलेल्या आणि आता शिवसेना शिंदे पक्षात गेलेल्या गाढवे यांनी सध्या भाजपने उमेदवारी दिलेल्या गाढवे वस्तीवरील उमेदवारा विरोधात प्रचारात चुरस निर्माण केली आहे. त्यांना पद्माकर आप्पा देशमुख यांच्या प्राचार्य यंत्रणेची साथ मिळाल्यामुळे आता या प्रभागातील चुरस वाढली आहे.

0 Comments