मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागातील प्रभाग ५ मध्ये शिवसेना उबाठाचे उमेदवार गणेश क्षीरसागर यांची प्रचारात मुसंडी
सपना दादाराव क्षीरसागर यांनाही मोठा प्रतिसाद असून
विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मशालिने या प्रभागातील वातावरण तापवले
गणेश क्षीरसागर यांच्यासारख्या निष्ठावंताला मशाल मिळाल्यामुळे शिवसैनिकांना स्फुरण
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागातील चर्चेत आलेल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर, ज्येष्ठ शिवसेना नेते दीपक मेंबर गायकवाड यांनी खुल्या प्रवर्गातून शिवसेनेने मशाल चिन्हावर गणेश नवनाथ क्षीरसागर या निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली आहे. शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या गणेश क्षीरसागर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून जनसंपर्क वाढवत विविध ठिकाणी कॉर्नर बैठका डोअर टू डोअर प्रचार त्याचबरोबर पक्षाचा वचननामा मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे.
त्यांच्या समवेत या प्रभागातून सपना दादाराव क्षीरसागर या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवत असून त्यांचाही प्रचार आता चांगलाच जोर धरत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांनी जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर यांच्या समवेत निर्णय घेत या प्रभागातून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांना कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची ? असा प्रश्न निर्माण झाला आहे असे असताना शिवसेना उबाठा पक्षाने मात्र या प्रभागात प्रचारात विकासाच्या मुद्द्यावर जोरदार मुसंडी मारली आहे.
चौकट
यापूर्वीच्या प्रभागातील समस्यांचा अभ्यास झालेल्या गणेश क्षीरसागर यांनी निवडणुकीत विकासाचे मुद्दे तापवायला प्रारंभ केला आहे. या प्रभागातील सर्वसामान्य मतदारांना विश्वासात घेण्याबरोबर शिवसैनिकांचा सन्मान जपण्यासाठीही गणेश क्षीरसागर प्रयत्नशील असून त्यांच्या प्रचारात त्यांचे स्नेही परिवारातील सहकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. शिवसेना पक्षाने आजवर केलेल्या पक्षकार्याची पोचपावती उमेदवारीच्या रूपात दिली असून पक्षांनी दिलेले या संधीचे सोने करून निश्चितपणे विजयी होऊ असा विश्वास गणेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

0 Comments