वाडा संस्कृती’ संपुष्टात; सोलापूरात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाड्या आमने-सामने!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजपसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत, तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी, शिंदे सेना, काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी वेगाने सुरू केली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जिल्ह्यात रणनीतीपूर्ण हालचालींना वेग आला आहे. इतर पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये होणारे प्रवेश ही भाजपची मोठी जमेची बाजू ठरली आहे. पक्षाने दिलेला पहिला टप्प्याचा टास्क पूर्ण करून जयकुमार गोरे यांनी ‘चाचणी परीक्षा’ उत्तीर्ण केली असून आता प्रतीक्षा आहे ती अंतिम निकालाची.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. तो अहवाल भाजप प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आला असून लवकरच उमेदवारांची घोषणा होणार आहे. स्थानिक तिकीट वाटपातील ‘वाडा संस्कृती’ला पूर्णविराम देत भाजपने यावेळी पारदर्शकता दाखविली आहे.
दरम्यान, भाजपकडून मित्रपक्षांना विश्वासात न घेता निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे काही मित्रपक्षांनी स्वतंत्र आघाड्या उभारून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
एकंदर, सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजपसाठी प्रतिष्ठेचा आणि इतर प्रमुख पक्षांसाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरणार असून, सोलापूरचे राजकारण आता तापू लागले आहे.
चौकट
>
पालकमंत्री जयकुमार गोरे उत्तीर्ण ‘चाचणी परीक्षा’; आता प्रतीक्षा अंतिम निकालाची
पालकमंत्री जयकुमार गोरे उत्तीर्ण ‘चाचणी परीक्षा’; आता प्रतीक्षा अंतिम निकालाची>
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘वाडा संस्कृती’ संपुष्टात
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘वाडा संस्कृती’ संपुष्टात>
सर्वपक्षीय आघाड्यांना मिळाले नवे राजकीय महत्त्व
सर्वपक्षीय आघाड्यांना मिळाले नवे राजकीय महत्त्व
0 Comments