Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना उबाठा पक्षाची मशाल हाती घेतलेल्या जिब्राईलभाई शेख परिवाराची समाजसेवाच त्यांना विजयी करणार

 शिवसेना उबाठा पक्षाची मशाल हाती घेतलेल्या जिब्राईलभाई शेख परिवाराची समाजसेवाच त्यांना विजयी करणार




शबाना बाबाजान शेख यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे प्रभागातील पारडे जड

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सातत्याने राजकीय चढउतार अशी परिस्थिती असलेल्या प्रभाग आठ मधील परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय तुल्यबळ बनताना दिसत होती. मात्र या प्रभागातून शिवसेना उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपकमेंबर गायकवाड, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या तथा माजी सरपंच सीमाताई पाटील आणि अन्य शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चाणाक्ष धोरणातून या प्रभागातून ओबीसी महिला प्रवर्गातून शबानाबाजान शेख यांना उमेदवारी देत अर्जही दाखल करून प्रचाराला शुभारंभ झाल्यामुळे या प्रभागातील शिवसेनेचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
कोरोना कालावधीत आणि दुष्काळात जिबाईल शेख यांच्या सामाजिक कार्याचा मोठा ठसा केवळ या प्रभागातच नाही तर संपूर्ण शहरभर उमटवला गेला आहे. त्यामुळे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सर्वांना आपलेसे करणारे जिब्राहील भाई शेख यांच्या मातोश्रींची उमेदवारी या प्रभागातील प्रत्येकाला जणू आपल्या घरातीलच उमेदवारी आहे असे वाटत असल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या विजयासाठी अंग झटकून कामाला लागला आहे. शेख परिवारातील अनेक सदस्य आपल्या मातोश्रींच्या विजयासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रत्येक सर्वसामान्याला भेटून शिवसेनेची अस्मिता असलेली मशाल चिन्ह प्रत्येकाला पटवून देत विकासाच्या वाटचालीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

चौकट
जिब्राईल शेख यांचे सामाजिक क्षेत्रातील लोकप्रियता त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि संपूर्ण शेख परिवाराचे या प्रभागातील असलेले सर्वसमावेशक धोरण या परिवाराच्या उमेदवारीसाठी खऱ्या अर्थाने पात्र असलेले निकष ठरले. शिवाय सर्वधर्मसमभाव आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याची माणुसकी या बाबीच जिब्राईल यांच्या मातोश्री शबाना यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरणार आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments