Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांच्या संपर्क अभियानाला गती

 मोहोळ नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांच्या संपर्क अभियानाला गती





शहरातील ज्येष्ठांच्या गाठीभेटी घेत प्रभावी पद्धतीने सुरू केला प्रचार

सुशील यांच्या स्वभावाने उमेदवारी जिंकली तर शीतल यांचा स्वभाव संपुर्ण निवडणूक जिंकणार

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीने आता चांगलीच गती घेतली आहे. छाननी नंतर कोणत्या उमेदवारीसाठी किती किती उमेदवार रिंगणात उतरले आहेत याची माहिती सर्वांना मिळाली. मात्र आता कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार ? आणि कोणाविरोधात कोण कोण लढणार ? याचे चित्र लवकर स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 
ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, भाजपकडून ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर यांच्या स्नुषा आणि पक्षाचे नगरसेवक असलेले निवडणूक प्रभारी सुशीलभैय्या क्षीरसागर यांच्या सुविद्य पत्नी शितल सुशील क्षीरसागर यांना उमेदवारीची घोषणा यापूर्वीच होऊन त्यांना पक्षाने एबी फॉर्म देखील सुपूर्द केला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून क्षीरसागर परिवाराने मोहोळ शहराच्या चारही दिशेला डोअर टू डोअर प्रत्येक सदस्याच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार सुरू केला आहे.

प्रारंभी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असणारे जेष्ठ नेते नागनाथ सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यावेळी नागनाथ सोनवणे म्हणाले की, माझी व तुमची स्पर्धा ही उमेदवारी निश्चित होइपर्यंतच होती.आत्ता ती स्पर्धा संपली आहे.आजपासून आम्ही नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या सूनबाई शीतल क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे म्हणाले. त्यानंतर शितल यांनी   चंदूकाका भिवरे,  डॉ.नसीर खान , राम ( मास्तर ) वनकळसे,नागेश वनकळसे, इमरान शफी शेख ,  बिलाल भाई शेख ,  अण्णासाहेब देशमुख ,  संजय पडवळकर , अपक्ष उमेदवार प्रशांत होनमाने , असलम बागवान  ,रुपेश धोत्रे दिलीप( काका)  देशपांडे ,  उमरभाई शेख , जुबेरभाई शेख आदींच्या घरी जाऊन भारतीय जनता  पक्षाची भूमिका मांडली.

 यावेळी त्यांच्या समवेत निवडणूक प्रभारी तथा त्यांचे पती सुशील भैय्या क्षीरसागर  रुपेश धोत्रे , शाही नाज बेगम  तलफदार, भारत बरे , अझरुद्दीन कुरेशी , प्रशांत गाढवे तानाजी (मेजर) माने हे उमेदवार तसेच  हेमंत गरड ,राजाभाऊ सुतार, ओंकार देशमुख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर, भाजपा शहर उपाध्यक्ष नवनाथ गाढवे, तेजस तलफदार, द्रोणाचार्य लेंगरे ,डॉ.किरण माने, अशोक गायकवाड, रंजना क्षीरसागर , ज्योती क्षीरसागर ,  सोनिया क्षीरसागर आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
सुशील यांच्या स्वभावामुळे उमेदवारी जिंकली तर शितल यांचा स्वभाव निवडणूक जिंकणार

भाजपच्या अधिकृत उमेदवार शितल क्षीरसागर यांचे पती सुशील क्षीरसागर हे अत्यंत मनमिळावू आणि शहरातील अजातशत्रू  व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. सुशील यांच्या स्वभावामुळे आणि अजोड पक्षनिष्ठेमुळेच क्षीरसागर परिवाराला उमेदवारीची संधी मिळाली. तर आता शितल यांच्या अतिशय नम्र आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे भाजपाला निश्चितपणे विजयी होऊ शकणारा एक युवा चेहरा उमेदवारीच्या रूपात मिळाला आहे.क्षीरसागर परिवारातील सदस्य भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रचाराला लागले आहेत. काल विविध ज्येष्ठ मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी परिचय स्वरूपात संवाद साधत पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रभावी संवाद कौशल्याने करत आपली उमेदवारी आणि भाजपा पक्ष हे मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कसे महत्त्वाचे आहेत हे त्यांनी सर्वांच्या लक्षात अत्यंत प्रभावीपणे आणून दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments