अनगर नगरपंचायत :
सर्वच्या सर्व सतरा जागा जिंकण्याबरोबर प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील ठरल्या भारतीय जनता पक्षाच्या देशातील पहिल्या बिनविरोध प्रथम नगराध्यक्ष
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागा बिनविरोध जिंकत नगराध्यक्षपदीही अनगरकर पाटील परिवाराच्या स्नुषा तथा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा यांच्या सुविद्य पत्नी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या विराजमान होणार आहेत काल झालेल्या नगराध्यक्ष आणि उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीमध्ये प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेल्या उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री ना. जयाकुमारभाऊ गोरे यांच्या कालावधीत अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेपासूनच्या पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्षपद आणि १७ जागा बिनविरोध करत नगरपंचायत ताब्यात घेत भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यात दमदार खाते उघडले असून भाजपाच्या भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने ही अत्यंत जमेची बाब म्हणावी लागेल.
सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद आणि सर्व जागा जिंकणाऱ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे किंगमेकर नेते आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाचे कॅबिनेट मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला हे घवघवीत यश मिळवून दिले आहे.
लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील या दोन्ही युवा बंधूंनी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेली नगरपंचायत आणि नगराध्यक्ष पदही बिनविरोध ठेवत संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाचा नावलौकिक वाढवला आहे. राजन पाटील त्यांचे सुपुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील या अनगरकर पाटील परिवारातील भारतीय जनता पक्षाच्या नूतन शिलेदारांचे राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
चौकट
काल सर्वोच्च सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या आणि आज अनगरसिद्ध महाराजांच्या आशीर्वादाने सर्व बंधू-भगिनींच्या आणि शुभचिंतकाच्या विश्वासाच्या जोरावर नगराध्यक्षपदी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध झाल्या ही निश्चितपणे यापुढील काळासाठी देशातील नगरपंचायतीसाठी प्रेरणादायी बाब म्हणावी लागेल.लोकनेते अण्णांच्या काळापासून अनगर पंचक्रोशी आणि परिसरातील बंधू-भगिनींनी गेली पन्नास वर्ष आत्मिक बंधुत्वातून आणि वडीलकीच्या नात्यातून आजवर अनगरकर -पाटील परिवारावर ठेवलेल्या या विश्वासाचे प्रतीक ही बिनविरोध निवडणूक आहे. यापूर्वी पासुनही सर्वसामान्यांसाठी काम करत आलो आहोत आणि यापुढील काळातही सर्वसामान्यांसाठी राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सेवा करत राहू.
राजन पाटील माजी आमदार
तथा ज्येष्ठ नेते भाजपा

0 Comments