भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मोहोळ येथील मुजीबभाई मुजावर यांची नियुक्ती
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पक्षाने देश स्तरापासून ते राज्यापर्यंत आणि राज्यापासून ते थेट ग्रामीण पातळीपर्यंत सर्वांगीण विकासासाठी यशस्वीरित्या प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचे मनात कमळ चिन्हाबाबत विकासाचा आढळ विश्वास कायम आहे. या पुढील काळातही मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने अविरतपणे प्रयत्नशील राहून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करेल अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ येथे दिली.
मोहोळ येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी आणि गेल्या दोन दशकापासून सातत्याने आणि प्रामाणिक भावनेने कार्यरत असलेले मुजीबभाई मुजावर यांची भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करताना भाजपचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्याचे भाजपचे कुशल संघटक शशिकांतनाना चव्हाण यांच्या हस्ते मुजीबभाई मुजावर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी मुजीबभाई मुजावर यांचा सन्मान जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण आणि युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मोहोळ नगरपरिषद निवडणुकीचे भाजप निवडणूक प्रभारी तथा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सतीशआप्पा काळे, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, तालुकाध्यक्ष रमेश माने सौंदणेचे जेष्ठ भाजपनेते शंकरनाना वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तथा पिंटू राऊत, माजी सरपंच हाजी बिलालभाई शेख, अनिसभाई कुरेशी, छगन अष्टूळ, विकास बनसोडे,दत्ता महाराज कारंजकर, शहाजान बागवान इत्यादी सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि मोहोळ शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments