Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपाच्या उमेदवारी मिळताच मेजर तानाजी माने यांच्या डोअर प्रचाराला वेग

 भाजपाच्या उमेदवारी मिळताच मेजर तानाजी माने यांच्या डोअर प्रचाराला वेग




प्रभागातील ज्येष्ठांच्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीने केला प्रचाराचा श्री गणेशा

उमेदवारीसाठी एकजुटीने पक्षश्रेष्ठींकडे मागणी लावून धरणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे डॉ. किरण माने यांनी मानले आभार

मोहोळ (साहिल शेख):- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्याच मार्गदर्शक नेतृत्वाखाली प्रभाग दहा सह संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. ही बाब मनाला सर्वस्वी पटल्याने प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वसाधारण प्रवर्गातून मला संधी द्यावी अशी मागणी लावून धरली. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि प्रभागातील मतदार बंधू-भगिनींचे प्रेम यामुळेच या निवडणुकीत मी उतरू शकलो आहे. अशी भावनिक कृतज्ञता प्रभाग 10 चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मेजर तानाजी माने यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचे सोने या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या स्वरूपात केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी गर्जनाही यावेळी मेजर माने यांनी केली.

माने परिवाराच्या श्रद्धास्थानातील श्री सिद्ध नागेश आणि प्रभाग 10 मधील जागृत देवस्थान मायाक्का देवी या देवदेवतांच्या दर्शनानंतर मेजर माने यांनी प्रभावी जनसंपर्काला शुभारंभ केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचाराने प्रभावित झालेले उमेदवार मेजर माने यांनी प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या आणि समविचारी घटकांतील मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत आपल्या प्रचाराचा अप्रत्यक्ष श्री गणेशा केला आहे.


चौकट
प्रभाग क्रमांक दहाच्या सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी मिळाल्यानंतर मोहोळच्या दक्षिण भागातील परिसरात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत असलेले उमेदवार मेजर तानाजी माने आणि त्यांचे सुपुत्र असलेले प्रभागातील भाजपचे युवा नेते डॉ. किरण माने यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत सर्वांशी हस्तांदोलन आणि मनमिळावू शैलीने प्रभागातून उमेदवारीसाठी सर्वांनी प्रयत्न केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

चौकट
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष सतीश काळे, निवडणूक प्रभारी सुशीलभैया क्षीरसागर यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रचार यंत्रणा सक्षम करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला ;या प्रभागातील जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पक्षाला होण्यासाठीची सविस्तर चर्चा केली. प्रभागातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेताना त्यांनी यापुढील काळात भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेने नगर परिषदेत सत्ता स्थापन झाल्यात निश्चितपणे प्रभागातील उर्वरित विकास कामांचे प्रश्न त्वरित सोडवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments