Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपविरोधातील आघाडीत बिघाडी

 भाजपविरोधातील आघाडीत बिघाडी



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडी निर्माण होणार असल्याची चर्चा अखेर फोल ठरली. काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उमे केल्यामुळे ही संभाव्य आघाडी केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिल्याने आता ही लढत तिरंगी

होणार हे स्पष्ट झाले आहे.

भाजपकडून आमदार नगराध्यक्षपदासाठी सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांची उमेदवारी जाहीर झाली. या पदासाठी माजी नगरसेवक महेश हिंडोळे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, पक्षाने कल्याणशेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान भाजपपासून दुरावलेले माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी हे भाजपविरोधी आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे विरोधी आघाडीची शक्ती आणखी कमी झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अश्पाक बळोरगी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताच आघाडीत पहिला तडा गेला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी नगरसेवक रईस टिनवाला यांना मैदानात उतरविले. यामुळे तिरंगी लढत अपरिहार्य बनली आहे. यंदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे प्रथमच शिवसेनेचे नेतृत्व करीत असल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. तर काँग्रेस आणि भाजपमधील पारंपरिक लवत याहीवेळी कायम राहणार आहे. भाजप उमेदवार अर्ज दाखल करताना आमदार कल्याणशेट्टी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांना सोबत आणत केलेल्या शक्तिप्रदर्शनाने पक्षकार्यकत्यांमध्ये उत्साहाने

वातावरण निर्माण झाले.

मिलन कल्याणशेट्टी यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरण आणखी बदलले आहे. कल्याणशेट्टी कुटुंबाचा शहरात मजबूत जनसंपर्क असल्याने त्यांना विविध समाजघटकांचा स्वाभाविक पाठिंबा मिळत आला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक कार्यामुळे अनेक वर्षापासून शहरात त्यांची सकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. विशेष म्हणजे, तरुणांमध्ये मिलन कल्याणशेट्टी यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस व शिवसेना शिंदे गटासाठी अधिकच आव्हानात्मक असून कल्याणशेट्टी यांच्या प्रभावाला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांना अधिक संघर्ष करावा लागणार आहे.

कल्याणशेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसकडून अश्पाक बोगी आणि शिवसेना शिंदे गटाकडून रईस टिनवाला उभे असल्याने या मुस्लीम समाजातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते सहा शेरीकर आणि काँग्रेसचे नेते सुनील खवळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडींमुळे दोन्ही पक्षांच्या गोटात खळबळ उडाली असून राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. त्याशिवाय वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष आणि चारवेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले महेश इंगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने प्रभाग क्रमांक अकरासह इतर प्रभागांतील गणितेही बदलली आहेत.

या सलग चार-पाच राजकीय घडामोडींमुळे भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली असून सुरुवातीपासून चर्चेत असलेली भाजपविरोधी आघाडी शेवटपर्यंत टिकू शकली नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी तिरंगी लढतीने स्पष्ट चित्र समोर येताच तालुक्यात आघाडीवी चर्चा ही फक्त फार्स ठरली

अशी प्रतिक्रिया उमटत आहे. विरोधकांची एकजूट खिळखिळी व्हावी यासाठी भाजपची गनिमी काव्याची राजकीय रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments