Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजमध्ये स्थानिक अस्मितेचा मुद्दा चिघळला – बाहेरगावच्या नेतृत्वाविरोधात नाराजीची लाट

 अकलूजमध्ये स्थानिक अस्मितेचा मुद्दा चिघळला – बाहेरगावच्या नेतृत्वाविरोधात नाराजीची लाट
अकलूज (कटूसत्य वृत्त):-  अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत तुफान चुरस निर्माण झाली असून मतदानापूर्वी ‘स्थानिक अस्मिता’ हा मुद्दा परमोच्च शिगेला पोहोचला आहे. भाजपचे बाहेरचे मोठे नेते अकलूजमध्ये येऊन शहराची बदनामी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत असून, या मुद्द्यावरून संपूर्ण निवडणुकीचा कौल फिरताना दिसत आहे.
माळशिरस तालुक्यातील राजकारण म्हटले की मोहिते-पाटील घराण्याचे नाव अग्रभागी राहिले आहे. या घराण्याने तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिल्याचे जनमानस मानते. भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्षातही रणजितसिंह मोहिते-पाटील नाव मोठ्या ताकदीने पुढे आले आहे.गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माण, खटाव, फलटण, सांगोला अशा विस्तृत भागातून मतदारांनी मोहिते-पाटील यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे अकलूजमध्ये ‘बाहेरचे नेते’ स्थानिकांवर वैयक्तिक टीका करत असल्याने लोकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
विरोधकांकडून मोहिते-पाटील यांच्यावर ‘दहशतीचे’ आरोप होत असले तरी “जर मोहिते-पाटील इतकेच भयानक आणि दडपशाही करणारे असते, तर आम्ही हलग्या-घंटा वाजवत अर्ज भरायला कसे आलो?”असा सवाल अकलूजकरांनी उघडपणे उपस्थित केला आहे. भाजपमधील काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या विधानांमुळे मतदारांत नाराजीचा सूर वाढत आहे.
माजी.आ.रामभाऊ सातपुते यांनी अकलूजमध्ये ‘दहशत’, ‘जुलूम’ आणि ‘राजकीय मक्तेदारी’ असे आरोप करत आक्रमक प्रचार सुरू केला आहे. मात्र त्यांच्या या सूरामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
शहराबद्दल बाहेरून नकारात्मक संदेश जात असल्याने:
* शिक्षण
* स्थानिक व्यवसाय
* उद्योग विकास
यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी नागरिकांची चिंता आहे.
मोहिते-पाटील घराण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून मोठी राजकीय मोहीम राबवली जात असल्याचे दिसते. यासाठी: नजीकच्या सहकाऱ्यांना तोडणे,सहकारी संस्थांवर दबाव निर्माण करणे, साखर कारखाना, बँका, दूध संघ, मार्केट कमिटी यांच्याविरुद्ध वातावरण बनवणे अशी अनेक धोरणात्मक पावले विरोधकांच्या बाजूने घेतली जात असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
गत काही वर्षांत अकलूज शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली:
* पाणीपुरवठा व्यवस्था
* वैद्यकीय सुविधा
* शिक्षण संस्था
* आधुनिक शहर सुविधांचा विस्तार
या सर्वामागे मोहिते-पाटील घराण्याचे नेतृत्व असल्याचे लोक मान्य करतात. त्यामुळे अकलूज आज महाराष्ट्रातील प्रगतीशील शहरांमध्ये गणले जाते.निवडणुकीत नवा वळण – मोहिते-पाटील एकत्र यावे, अशी जनतेची मागणी.या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे,दोन्ही राष्ट्रवादीत मोहिते-पाटील एकाच बाजूला यावेत! राष्ट्रवादी – अजित पवार गटातून डॉ.दवलसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकृत पॅनल उभे केले असून, नागरिकांमध्ये भावना अशी आह.बाहेरून आलेले आक्रमक नेते परतावेत, अकलूजच्या अस्मितेची बाजू मजबूत व्हावी,मोहिते-पाटील एकत्र आल्यास या भागाचे रक्षण आणि विकास अधिक वेगाने होईल .या भावनेला सध्या लोकांमध्ये मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments