सोलापूर–पुणे महामार्गावर कारची टेम्पोला धडक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 13, 2025

सोलापूर–पुणे महामार्गावर कारची टेम्पोला धडक

सोलापूर–पुणे महामार्गावर कारची टेम्पोला धडक




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर–पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे जण गंभीर तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.

सोलापूरहून पुण्याकडे जात असलेली व्हॅगनार कार (क्रमांक MH 12 XQ 8753) भरधाव वेगाने जात असताना तिच्या पुढील टायरचा स्फोट झाला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार अनियंत्रित होऊन बेंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात कारमधील सौ. रत्ना राजेंद्र परमाणी (वय ६५, रा. पुणे) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, चालकासह अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना शेटफळ ग्रामीण रुग्णालयातील १०८ शासकीय रुग्णवाहिकेमधून तत्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. रुग्णवाहिकेमध्ये डॉ. प्रदीप पाटील व चालक सिद्धेश्वर राऊत यांनी तत्परता दाखवली.

अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक, रुग्णवाहिका पथक, तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी PSI उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताची नोंद मोहोळ पोलिस ठाण्याच्या अपघात विभागात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अधिकारी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वरवडे टोल प्लाझा ग्रस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंखे यांनी अपघातासंदर्भातील सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages