Hot Posts

6/recent/ticker-posts

बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आयोजन

 बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आयोजन

 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 14 नोव्हेंबर हा देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयसोलापूर यांच्यातर्फे बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने 14 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहेअशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी दिली आहे.
जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिल्ह्यात20 नोव्हेंबर 2025 पर्यंतकारखानेआस्थापनाहॉटेलगॅरेज आणि धोकादायक उद्योगांना भेटी देऊन बालकामगार प्रथा विरोधी मोहिम राबवली जाईल. या मोहिमेत पोस्टर चिकटविणेबालकामगार विरोधी पत्रके वाटप करणेआणि जनजागृती करणे यांचा समावेश असेल.
कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळल्यास त्यांची मुक्तता केली जाईल आणि बालकामगार अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. बालकामगार आस्थापनांमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा असलेले आहे. त्यामुळे14 वर्षाखालील बालकामगार काम करत नाहीत याची हमी संबंधितांकडून घेतली जाईल.
हॉटेल असोसिएशनदुकानेव्यापारी संघटनाआणि औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन्ससह बैठका आयोजित करूनबाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम1986 मधील तरतुदींची माहिती देण्यात येईल. या बैठकींमधून सामुदायिक शपथ घेणे आणि हमी पत्र भरून घेणे यांचा समावेश असेल.
सहाय्यक कामगार आयुक्तनिलेश येलगुंडे यांनी सर्वांना आवाहन केले आहे कीकारखानाआस्थापनाहॉटेलगॅरेज आणि धोकादायक उद्योगांमध्ये बालकामगार ठेवू नये. 
Reactions

Post a Comment

0 Comments