राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा भव्य शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा भव्य शुभारंभ

राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा भव्य शुभारंभ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाज सेवा मंडळ संचलित राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय, विडी घरकुल येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील क्रीडा सप्ताहाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन महेश माने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर बाबुराव खंडाळकर, शालेय समिती सदस्य मंगेश भारत जाधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवपूर्ण स्वरूप दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य पवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा प्रमुख माळी सर यांनी करत क्रीडा सप्ताहाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यानंतर सहशिक्षिका कु. लोहार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देऊन आठवडाभर चालणाऱ्या क्रीडा उपक्रमांची प्रेरणादायी सुरुवात केली. शिस्त, खेळाडूवृत्ती आणि संघभावना जोपासण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.


 प्राचार्य पवार सर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना क्रीडाद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा हे शिक्षणाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कु. नांदुरकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. माने मॅडम यांनी केले.


या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा सप्ताहाच्या शुभारंभामुळे शाळेत खेळाची नवी ऊर्जा संचारली असून, विद्यार्थीभावी स्पर्धांसाठी उत्साहाने सज्ज झाले आहेत.

हा सोहळा शाळेच्या सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages