अक्कलकोट शहर प्रतिनिधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

अक्कलकोट शहर प्रतिनिधी

 अक्कलकोट शहर प्रतिनिधी 




माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व कुटुंबीयांनी जर दुधनीत  गुंडगिरी  व दहशत निर्माण केली असती तर दुधनीतील जनतेने साठ वर्ष त्यांना आशीर्वाद देऊन नगरपालिकेवर सत्ता दिली नसती. दुधनी च्या विकासा साठी निधी कमी पडु देणार नाही.आपण निश्चित रहा आपल्या पाठीमागे संपूर्ण शिवसेना मंत्री पदाधिकारी उभे आहेत असे मत दुधनी येथे शुक्रवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेच्या उमेदवाराच्या  प्रचार सभेमध्ये उद्योग मंत्री उदय सावंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे, अमोल बापू शिंदे, गुरूशात परमशट्टी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, राजशेखर दोशी , चंद्रकांत येगदि, शिवानंद माड्याळ,अशोक पादि, विठ्ठल अमाणे,बसवराज हौदे,व सर्व नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले दुधनी गावातील युवकांच्या हाताला काम मिळावा म्हणून अजून नगराध्यक्ष झाले नाही तरी गावच्या विकासासाठी युवकांच्या कल्याणासाठी दुधनी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे मागणी केली आहे. याला म्हणतात गावचा विकास व गावातील युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून धडपडणारा युवा नेता आहे प्रथमेश म्हेत्रे यांनी केलेल्या मागणीला मी पुढील ९० दिवसात मंजुरी देतो आपण ही दुधनीवासीयांनीही शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन केले दुधनी च्या विकासा साठी निधी कमी पडु देणार नाही शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना  तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरपुर निधी दिलेला आहे. ते कामे आता  चालु आहेत कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नयेत असेही मंत्री सावंत यानी म्हणाले .
साठ वर्षाची परंपरा असलेले काँग्रेस पक्ष सोडून आपण शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहात अक्कलकोट तालुका व दुधनी च्या विकासासाठी कुठलीही निधी कमी पडू देणार नाही. आपण निश्चित रहा आपल्या पाठीमागे संपूर्ण शिवसेना मंत्री पदाधिकारी उभे आहेत
तालुक्यातील विकासाच्या साठी झटणाऱ्या म्हेत्रे कुटुंबीयांवर खोटे-नाट्य आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न या कुणी करत असतील तर त्यांना दुधनीकरांनी त्यांची जागा दाखवून द्यावी विजय आपलाच आहे युवा सेनेचा नगराध्यक्ष म्हणून दुधनी तुनच होणार  आहे. 
कुणीही काही बोलले तरी जोपर्यंत सूर्य चंद्र आहे ते वर ल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे.
हे शाश्वत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांना बहुमताने निवडून द्या शिंदे साहेबांचे व म्हेत्रे साहेबांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी उद्योग मंत्री उदय सावंत यानी आव्हान केला आहे 
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की,७० वर्षापासून येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहेत.काही लोक मात्र दुधीला पाणी मिळत नाही असे खोटे दिंडोरा पेटत आहे.ते लहान वयाचे असुन त्यांना बुद्धीही कमी आहे.३ तारखेनंतर मैदानात उतरणार आहे.आणि याची कुंडली बाहेर काढतो.एकनाथ शिंदे यांनी बंड केले म्हणून हे लोक सत्तेत आहेत.ह्या लोकांवर एकनाथाची पुण्याई आहे.एवढे ध्यानात ठेवावे.असे म्हणाले.
चौकट विरोधकांकडे कुठलीही विकासाची व्हिजन नाही म्हणून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व  कुटुंबीयांवर वारंवार गुंडगिरी दहशत पसरवतात असे खोटे आरोप करून नागरिकांमध्ये अफवा पसरवत आहेत विरोधकांनी आजपर्यंत गावच्या विकासा त कोणत्याही योगदान नाही फक्त नागरिकांवर दबाव टाकणे काम चालू आहे पण गावच्या विकासासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आपण निवडून द्या मी दुधनीचा  विकास करून दाखवण्याची संधी मला द्या असे आव्हान प्रथमेश म्हेत्रे यांनी केले 
चौकट प्रथमेश म्हेत्रे  हा माझा मुलगा नसून समस्त दुधनी करांचा मुलगा आहे तो उच्चशिक्षित असूनही कोणतीही नोकरी व व्यवसाय उद्योगाकडे न वळता दुधनीकारांच्या सेवेसाठी आपल्या ओटी टाकलेला आहे आपण त्याला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन शिवसेनेने शंकर म्हेत्रे यांनी केले आहे 

मागील ७० वर्षापासून दुधनी शहराचा विकास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शंकर म्हेत्रे त्यांच्या माध्यमातून झालेले आहे विरोधकांनी शहराच्या विकासासाठी काही केले नाही उलट गोरं गरीबांचे अतिक्रमण काढून त्याच्या वर उपासमारीची वेळ आणले आहे अशा खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे त्यान यावेळी दुधनी तील जनता चांगलाच धडा शिकवणार आहे 
बसवराज हौदे  शिवसेना युवा नेता

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages